Marathi Suvichar
|

Marathi Suvichar | 1200+ सर्वश्रेष्ठ मराठी सुविचार !

ज्या माणसांकडे विचारांचा भक्कम पाया नाही त्या माणसांच्या आयुष्याची इमारत उभीच राहू शकत नाही. कोणत्याही कृतीच्या मुळाशी एक माणूस म्हणून यशस्वी जीवन जगू पाहणाऱ्या प्रत्येकाने हे मराठी सुविचार Marathi Suvichar १००% आचरणात आणायला हवं.

Marathi Suvichar

समुद्रात कितीही मोठे वादळ आले तरी,
समुद्र आपली शांतता कधीही सोडत नाही.

नेहमी तत्पर रहा,
बेसावध आयुष्य जगू नका.

विश्वास हा खोडरबर सारखा असतो तुम्ही,
केलेल्या प्रत्येक चुकीबरोबर तो कमी होत जातो.

भूक आहे तेवढे खाणे ही प्रकृती,
भूक आहे त्यापेक्षा जास्त खाणे ही विकृती,
आणि वेळप्रसंगी स्वत: उपाशी राहून,
दुसऱ्याची भूक भागवणे ही संस्कृती.

गरूडाइतके उडता येत नाही,
म्हणून चिमणी कधी उडण्याचे सोडत नाही.

भरलेला खिसा माणसाला दुनिया दाखवतो,
रिकामा खिसा मात्र दुनियेतील माणसं दाखवतो.

संकटं टाळणं माणसाच्या हाती नसतं,
पण संकटाचा सामना करणं,
त्याच्या हातात असतं.

विजेते वेगळ्या गोष्टी करत नाही,
ते प्रत्येक गोष्ट वेगळेपणाने करतात.

खूप माणसांची स्वप्ने या एका विचारामुळे
अपूर्ण राहतात तो म्हणजे “लोक काय म्हणतील?

अन्याय करणे हे पाप आणि
होणारा अन्याय सहन करणे,
किंवा उघड्या डोळ्यांनी पाहणे हे महापाप !

अडचणीत असतांना अडचणीपासून दूर पळणे
म्हणजे अजून मोठ्या अडचणीत जाण्यासारखेच आहे.

थोडे दुःख सहन करुन,
दुसऱ्याला सुख मिळत असेल तर,
आपण थोडे दुःख सहन करायला
काय हरकत आहे.

मोठी स्वप्ने पाहणारेच,
मोठी स्वप्ने सत्यात उतरवतात.

खूप मोठा अडथळा आला की समजावं
आपण विजयाच्या जवळ आलो.

स्वप्न पाहतच असालं तर मोठीच पाहा. लहान कशाला?
कारण मोठी स्वप्नेच माणसाच रक्त ढवळू शकतात.

आपली खरी स्वप्न तीच आहेत जी आपल्याला
रात्री उशिरापर्यंत जगण्यास आणि
सकाळी लवकर उठण्यास भाग पाडतात.

मराठी सुविचार

जीवनात चांगला माणूस होण्यासाठी एवढंच करा.
चुकाल तेव्हा माफी मागा,
अन कुणी चुकलं तर माफ करा.

न हरता, न थकता न थाबंता
प्रयत्न करणाऱ्यांसमोर
कधी कधी नशीब सुध्दा हरत.

जीवनात त्रास त्यांनाच होतो
जे सतत जबाबदारी स्वीकारतात आणि
जबाबदारी स्वीकारणारे कधीच हरत नाही
एकतर ते जिंकतात किंवा काहीतरी शिकतात.

कारण सांगणारी लोक यशस्वी होत नाही.
आणि यशस्वी होणारे लोक कारण सांगत नाही.

यश प्राप्त करण्यासाठी,
यशस्वी होण्यासाठीची तुमची इच्छा हि
अपयशी होण्याच्या भीतीपेक्षा
जास्त प्रबळ असली पाहिजे.

जर तुम्हाला तुमची श्रीमंती मोजायची असेल तर
नोटा मोजू नका कधी चुकून डोळ्यांत दोन अश्रू आले
तर ते पुसायला किती जन येतात ते मोजा.

कुणा वाचून कुणाचे काहीच अडत नाही
हे जरी खरे असले तरी कोण
कधी उपयोगी पडेल हे सांगता येत नाही.

माणसानं राजहंसासारखं असावं.
आपल्याला जे पटेल तेच घ्यावं,
नाही ते सोडून द्यावं.

मोत्याच्या हारापेक्षा
घामाच्या धारांनी मनुष्य
अधिक शोभून दिसतो.

या दोन गोष्टींमुळे जग तुम्हाला ओळखते,
तुमच्याजवळ काहीच नसतांना तुम्ही बाळगलेला संयम
आणि तुमच्याजवळ सर्वकाही
असतांना तुम्ही दाखवलेला रुबाब.

जिंकणे म्हणजे नेहमी फक्त पहिला येणे असे नसते,
एखादी गोष्ट पूर्वीपेक्षा
जास्त चांगली करणे म्हणजेच जिंकणे होय.

कावळ्याच्या मरणाचे वाईट वाटत नाही;
मात्र मोर मेला तर आपण हळहळतो.
कारण सौंदर्य नष्ट होते.

Suvichar in Marathi

यशाकडे नेणारा सर्वात जवळचा मार्ग
अजून तयार व्हायचा आहे.

डोक शांत असेल तर निर्णय चुकत नाही,
भाषा गोड असेल तर माणसं तुटत नाहीत.

डोक शांत असेल तर निर्णय चुकत नाही,
भाषा गोड असेल तर माणसं तुटत नाहीत.

मानसिक स्वातंत्र्य हेच खरे स्वातंत्र्य आहे.
ज्याचे मन स्वतंत्र नाही तो मोकळा असूनही गुलाम आहे.

आपल्याला मदत करणाऱ्या
माणसांशी नेहमी कृतज्ञ रहा.

जगा इतकं कि आयुष्य कमी पडेल,
हसा इतके कि आनंद कमी पडेल,
काही मिळाले तर नशिबाचा खेळ आहे,
पण प्रयत्न इतके करा कि
परमेश्वराला देणे भागच पडेल.

एखाद्याला गुन्हेगार ठरविताना
त्याच्या जागी स्वत:ला ठेवून बघा.

कोणाच्याही सावलीखाली उभा राहिल्यावर
स्वतःची सावली कधीच निर्माण होत नाही.
स्वतःची सावली निर्माण करण्यासाठी
स्वतः उन्हात उभे रहावे लागते.

कोणी कौतुक करो वा टीका लाभ तुमचाच,
कौतुक प्रेरणा देते, तर टीका सुधारण्याची संधी.

स्वतःची तुलना इतरां बरोबर करू नका,
तसे केल्यास तुम्ही स्वतःचा अपमान करता आहात.

आयुष्यात कधीही कोणासमोर
स्वतःच स्पष्टीकरण देत बसू नका
कारण ज्यांना तुम्ही आवडता,
त्यांना स्पष्टीकरणाची अजिबात गरज नसते,
अन ज्यांना तुम्ही आवडत नाही ते
तुमच्या स्पष्टीकरणावर कधीच
विश्वास ठेवायला तयार होत नाही.

Suvichar Marathi

बोलावे की बोलू नये,
असा संभ्रम निर्माण झाला असता
मौनाने बोलण्याची जागा घ्यावी.

छत्री पावसाला थांबवू शकत नाही
पण पावसात थांबण्याचे धाडस नक्की देऊ शकते,
तसेच आत्मविश्वास यशस्वी होण्याची खात्री
देऊ शकत नाही पण
संघर्ष करण्याची प्रेरणा नक्की देऊ शकतो.

शत्रूने केलेले कौतुक
हीच आपली सर्वोत्तम कीर्ती होय.

शत्रूने केलेले कौतुक
हीच आपली सर्वोत्तम कीर्ती होय.

आयुष्यात पैसा हवा पण पैशात आयुष्य नको.

तिरस्कार पापाचा करा;
पापी माणसाचा नको.

जर तुम्ही नेहमीच सार्वसाधारण जीवन जगण्याचा
प्रयत्न करीत असालं तर,
तुम्हाला कधीच हे उमजणार नाही कि,
तुम्ही किती असामान्य आहात.

जरूरीपेक्षा अधिक गरजांचा हव्यास ठेवू नका.

हृदये परस्परांना द्यावीत,
ती परस्परांच्या अधीन करू नयेत.

प्रत्येक पाऊल योग्य नसते,
पण धोके पत्करून त्यातून जे शिकत जातात
ते धेय्य नक्की गाठतात.

कधी कधी देव तुमची परिस्थिती बदलत नाही
कारण त्याला तुमची मनस्थिती बदलायची असते.

कर्तव्य पार न पाडता हक्कांच्या मागे
धावलात तर हक्क दुर पळतात.

Changle Vichar Marathi

आपण कसे दिसतो यापेक्षा
कसे असतो याला अधिक महत्त्व आहे.

जग प्रेमाने जिंकता येतं; शत्रुत्वाने नाही.

न मागता देतो तोच खरा दानी.

यश मिळवायचं असेल तर
स्वत:च स्वत:वर काही बंधन घाला.

भितीयुक्त श्रीमंत जीवन जगण्यापेक्षा
शांततामय, मानाचे गरीब जीवन चांगले.

यश मिळवण्यासाठी
सगळ्यात मोठी शक्ती – आत्मविश्वास.

निश्चयी भिकारी हा अनिश्चयी
सम्राटापेक्षा कितीतरी श्रेष्ठ असतो.

मित्र परिसासारखे असावेत
म्हणजे आयुष्याचं सोनं होतं.

निःस्वार्थी मन हाच सर्वोच्च आदर्श आहे.

माणसाची खरी ओळख
त्याच्या अंतःकरणाच्या नम्रतेने होते.

बुध्दीला पटल्याशिवाय
कोणताही विचार स्वीकारू नका.

उशीरा दिलेला न्याय हा
न दिलेल्या न्यायासारखा असतो.

संकटात उडी घेऊन जे कार्य करतात
त्यांनाच विजयश्री हार घालते.

शरीराला आकार देणारा
कुंभार म्हणजे व्यायाम.

परीसाच्या स्पर्शाने लोखंडाचंही सोनं होतं.

शहाणा माणूस चुका विसरतो,
पण त्याची कारणे नाही.

Also Read:

http://Latest Duniya Shayari in Hindi | Duniya Shayari 2 line

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *