Friendship Quotes in Marathi | 1200+ मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !
मैत्री हे असे नाते आहे जे आपण स्वतः ठरवून रक्ताच्या नात्यापेक्षाही अधिक घट्ट नाते बनवू शकतो. रक्ताच्या नात्याइतकेच मैत्रीचे नातेदेखील घट्ट असते. मैत्रीत स्त्री – पुरुष हा भेदभाव नसतो. मैत्री हे एक अनमोल नाते आहे. प्रेमापेक्षा मैत्री महत्त्वाची असते कारण प्रेम तर सगळ्यांना एकदा तरी रडवते आणि मैत्री ही दुःखात हसवते. मैत्री एक हवंहवंसं वाटणारं आपुलकीचं नातं. मैत्रीच्या नात्यात कोणतीही बंधन नसतात. जगातील सर्व नात्यांच्या पलीकडे असलेलं मैत्रीचं नातं आयुष्यभर साथ देतं. मैत्रीचे हे बंध एकमेकांशी कधी जुळतात हे कोणालाच कळत नाहीत. मात्र एकदा का असे हे रेशीमबंध जुळले की ते कधीच कोणत्याही कारणासाठी तुटत नाहीत. ऑगस्टचा पहिला रविवार हा जागतिक मैत्री दिन अथवा फ्रेंडशिप डे म्हणून साजरा केला जातो. आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत Friendship Quotes in Marathi फ्रेंडशिप शुभेच्छा संदेश मराठी मध्ये या संग्रहाच्या मदतीने आपल्या मित्रांना एका अनोख्या अंदाजात फ्रेंडशिप शुभेच्छा द्या.
Friendship Quotes in Marathi
मैत्री करत असाल तर,
पाण्या सारखी निर्मळ करा.
दूर वर जाऊन सुद्धा,
क्षणों क्षणी आठवेल अशी करा.
माझी मैत्री कळायला,
तुला थोडा वेळ लागेल.
पण ती कळल्यावर,
तुला माझं वेड लागेल.
मैत्रीच्या सहवासात
अवघं आयुष्य सफ़ल होतं,
देवाच्या चरणी पडून जसं
फ़ुलांचही निर्माल्य होतं.
बहरू दे आपल मैत्रीच नात,
ओथंबलेले मन होऊ दे रित,
अशीच असुदे तुझ्या मैत्रीची साथ
घट्ट पकड माझ्या मैत्रीचा हात.
जन्म एका टिंबासारखा असतो,
आयुष्य एका ओळीसारखं असतं,
प्रेम एका त्रीकोनाप्रमाणे असतं,
पण मैत्री असते ती,
वर्तुळासारखी कि ज्याला शेवट नसतो.
रक्ताच्या नात्यात नसेल एवढी
मैत्रीच्या नात्यात ओढ असते,
कशी ही असली तरी,
शेवटी मैत्री गोड असते.
खरच मैत्री असते
पिंपळाच्या पाना सारखी त्यांची किती
ही जाळी झाली तरी,
ती मनाच्या पुस्तकात जपून ठेवावीशी वाटती.
काही शब्द नकळत कानावर पडतात,
कोणी दूर असुनही उगाच जवळ
वाटतात खर तर ही मैञीची नाती
अशीच असतात आयुष्यात येतात,
आणि आयुष्यच बनून जातात.
मैत्री नावाच्या नात्याची,
वेगळीच असते जाणीव,
भरून काढते आयुष्यात,
प्रत्येक नात्यांची उणीव.
जीवनात दोनच मित्र कमवा,
एक “श्रीकृष्णासारखा” जो तुमच्यासाठी,
युध्द न करताही तुम्हाला विजयी करेल आणि
दुसरा ” कर्णासारखा” जो तुम्ही चुकीचे असतानाही
तुमच्यासाठी युध्द करेल.
चांगले मित्र,
हात आणि डोळे प्रमाणे असतात,
जेह्वा हाताना यातना होतात,
तेह्वा डोळे रडतात आणि जेह्वा
डोळे रडतात तेह्वा हात अश्रू पुसतात.
रक्ताची नाती जन्माने मिळतात,
मानलेली नाती मनाने जुळतात,
पण नाती नसतानाही जी बंधनं जुळतात,
त्या रेशमी बंधनांना मैत्री म्हणतात.
मैञीला नसतात शब्दांची बंधने,
त्याला असतात ती फक्तहदयाची स्पंदने,
मैञी व्यक्त करण्यासाठी कधी कधी शब्द अपुरे पडतात,
पण अंतःकरणापासुन व्यक्त केले तर
चेहऱ्यावरील भावही पुरेसे असतात.
मैत्री म्हणजे मायेची साठवण,
मनाने मनाला दिलेली प्रेमाची आठवण
हा धागा नीट जपायचा असतो,
तो कधी विसरायचा नसतो
कारण ही नाती तुटत नाहीत,
ती आपोआप मिटून जातात
जशी बोटांवर रंग ठेवून
फुलपाखरे हातून सुटून जातात.
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
चांगल्या मैत्रीला,
वचन आणि अटींची गरज नसते.
फक्त दोन माणसं हवी असतात,
एक जो निभाऊ शकेल,
आणि दुसरा जो त्याला समजु शकेल.
तेज असावे सूर्यासारखे,
प्रखरता असावी चंद्रासारखी,
शीतलता असावी चांदण्यासारखी,
आणि मैत्री असावी तुझ्यासारखी.
मैत्री करत असाल तर
चंद्र तारे यां सारखी अतूट करा..
ओंजळीत घेवून सुद्धा
आकाशात न मावेल अशी करा.
मैत्री म्हणजे पान नसते सुकायला,
मैत्री म्हणजे फुल नसते कोमेजायला,
sमैत्री म्हणजे फळ नसते पिकायला,
मैत्री म्हणजे फांदी नसते तुटायला,
मैत्री म्हणजे मुळ असते
एकमेकांना आधार द्यायला.
असे हृदय तयार करा की, त्याला कधी तडा जाणार नाही,
असे हास्य तयार करा की, ह्रदयाला त्रास होणार नाही,
असा स्पर्श करा की, त्याने जखम होणार नाही,
अशी मैत्री करा की, त्याचा शेवट कधी होणार नाही.
काही नाती बनत नसतात.
ति आपोआप गुंफली जातात
मनाच्या ईवल्याशा कोपऱ्यात
काहि जण हक्काने राज्य करतात.
त्यालाच तर “मैत्री” म्हणतात.
मैत्री एक अलगद स्पर्श मनाचा
sमैत्री एक अनमोल भेट जीवनाची,
मैत्री एक अनोखा ठेवा आठवणींचा,
मैत्री एक अतूट सोबत आयुष्याची.
मैत्री म्हणजे संकटाशी झुंजणारा वारा असतो.
विश्वासाने वाहणारा आपुलकीचा झरा असतो.
मैत्री करत असाल तर
दिव्यातल्या पणती सारखी करा.
अंधारात जे प्रकाश देईल
हृदयात असं एक मंदीर करा.
मैत्री करत असाल तर
निसर्गा पेक्षा ही सुंदर करा..
शेवट पर्यंत निभावण्या
करता मरण सुद्धा जवळ करा.
Friendship Day Quotes in Marathi
ओठावर तूझ्या स्मित हास्य असु दे.
जिवनात तूझ्या वाईट दिवस नसु दे.
जिवनाच्या वाटेवर अनेक मित्र मिळतील तुला परंतु,
हदयाच्या एका बाजुस जागा मात्र माझी असु दे.
काट्यांवर चालून दुसऱ्यासाठी
रचलेली फुलाची रास म्हणजे मैत्री.
तिखट लागल्यावर घेतलेला
पहिला गोड घास म्हणजे मैत्री.
एकटे असल्यावर झालेला खराखूरा भास म्हणजे मैत्री.
मरताना घेतलेला शेवटचा श्वास म्हणजे मैत्री.
पावसातुन जेवढा ओलावा मिळत नाही
तेवढा जिव्हाळा मैत्री मधुन मिळतो,
मैत्री मधल्या सावलीचा अर्थ
कधी तरी उन्हातुन आल्यावरच कळतो.
विसरु नको तु मला,
विसरणार नाही मी तुला,
विसरतो का कधी कोण आपल्या मिञाला,
मैञीन तर तुच आहेस माझी खास,
कस विसरु शकतो मी तुला.
मैत्री,नको फुलासारखी,शंभर सुगंध देणारी.
नको सूर्यासारखी ,सतत तापलेली.
sनको चंद्रासारखी,दिवसा साथ न देणारी.
नको सावली सारखी,कायम पाठलाग करणारी.
मैत्री हवी अश्रुसारखी, सुख दुखात समान साथ देणारी.
जे जोडले जाते ते नाते,
जी जडते ती सवय,
जी थांबते ती ओढ,
जे वाढते ते प्रेम,
जो संपतो तो श्वास,
पण निरंतर राहते ती मैत्री,
आणि फक्त मैत्री.
मैत्री एक गांव असत
आणी मैत्रिण हे त्याहून सुन्दर नाव असत
हे नाव असत आनंदाच नाव असत दिलेल्या धीराच,
मदतीच्या हाताच आयुष्यातल्या आनंदघनाच
मैत्रिण हे नाव असत वरवर साध वाटल
तरी काळजाचा ठाव असत.
श्वासातला श्वास असते मैत्री
ओठातला घास असते मैत्री
काळजाला काळजाची आस असते मैत्री
कोणीही जवळ नसताना साथ असते ती मैत्री.
मैत्री म्हणजे शब्दांशिवाय एकमेकांच मन जाणून घेण,
चुकलं तर ओरडण, कौतुकाची थाप देण,
एकमेकांचा आधार बनण, मैत्री म्हणजे अतूट विश्वास.
मैत्री म्हणजे आयुष्याचा प्रवास सुसह्य करणारी हिरवीगार पाऊलवाट.
कोणी कितीही बोललं तरी,
कोणाचं काही ऐकायचं नाही,
कधीही पकडले गेलो तरी,
मित्रांची नावं सांगायची नाही.
Best Friend Quotes in Marathi
मैञी असावी प्रकाशासारखी मनाचा
आसमंत उजवल करणारी,
मैञी असावी एक मार्ग स्वप्ऩांना सत्यात उतवणारी,
sमैञी असावी विश्वासाची हिशेबाची उठाठेव न करणारी,
मैञी असावी सुखाची साथीदार अन दुःखाची भागीदार.
दिवा मातीचा आहे कि सोन्याचा आहे हे महत्वाचे नसून,
तो अंधारात किती प्रकाश देतो हे महत्वाचे आहे,
त्याच प्रमाणे मित्र श्रीमंत आहे कि गरीब आहे हे महत्वाचे नसून,
तो तुमच्या संकटात किती खंबीर पणे तुमच्या पाठीशी
उभा राहतो हे महत्वाचे आहे.
नुसता रुबाबच नाही तर धमक पण आहे .
आणि नुसता पैसा नाही तर, मनाची श्रीमंतीपण आहे .
आणि म्हणुनच तुम्ही मित्र असल्याचा
नुसता गर्वच नाही तर माजपण आहे.
गुलाब उमलतो नाजुक काट्यावर.
गवत झुलते वा-याच्या झोतावर.
पक्षी उडतो पंखाच्या जोरावर.
माणूस जगतो आशेच्या किरणावर .
आणि मैत्री टिकते ती फक्त “विश्वासावर”
गुलाब उमलतो नाजुक काट्यावर.
गवत झुलते वा-याच्या झोतावर.
पक्षी उडतो पंखाच्या जोरावर.
माणूस जगतो आशेच्या किरणावर .
आणि मैत्री टिकते ती फक्त “विश्वासावर”
पानाच्या हालचाली साठी वार हव असत,
मन जुळण्या साठी नात हव असत,
नात्यासाठी विश्वास हवा असतो,
त्या विश्वासाची पहिलि पायरी म्हणजे?
“मैञी” मैञीच नात कस जगावेगळ असत,
रक्ताच नसल तरी मोलाच असत.
जीवन आहे तिथे आठवण आहे,
आठवण आहे तिथे भावना आहे,
भावना आहे तिथे मैत्री आहे,
आणि जिथे मैत्री आहे तिथे फक्त तुच आहे.
आयुष्यात माझ्या जेव्हा,
कधी दुःखाची लाट होती,
कधी अंधेरी रात होती,
सावलीलाही भिणारी एकट्याची अशी वाट होती,
तेव्हा फक्त मित्रा तुझी आणि तुझीच साथ होती.
पाकळ्यांचं गळणं म्हणजे फुलांचं मरणं असतं.
मरतांनाही सुगंध देणं यातच आयुष्याचं सार असतं,
असं आयुष्य जगणं म्हणजे खरच सोनं असतं.
पण या आयुष्यात तुमच्या सारखे मित्र मिळाले तर,
हे जगणं सोन्याहून पिवळं असतं.
Also Read: