Life Status in Marathi | 1200+बेस्ट मराठी जीवन स्टेटस
कितीही संकटे आली तरी डगमगून न जाता व कोणत्याही कठीण परिस्थितीतून बाहेर पाडण्यासाठी Marathi Status on life चा संग्रह आपल्याला मदत करेल. ज्या माणसांकडे विचारांचा भक्कम पाया नाही त्या माणसांच्या आयुष्याची इमारत उभीच राहू शकत नाही. आणि यदाकदाचित समजा, ती उभी राहिलीच तरी ती भक्कम असेलच असं आपण ठामपणे म्हणू शकत नाही. विचारांचा भक्कम पाया असणारी माणसं कुठल्याही प्रसंगी ठामपणे उभी राहतात. एक माणूस म्हणून यशस्वी जीवन जगू पाहणाऱ्या प्रत्येकाने Life Status in Marathi हा संग्रह वाचायला हवा.
Life Status in Marathi
कोणत्याही माणसाला अडचणीत जपा,
तो तुम्हाला आयुष्यभर जपेल.
संकटं तुमच्यातली शक्ती,
जिद्द पाहण्यासाठीच येत असतात.
तुम्ही किती जगलात ह्यापेक्षा
कसं जगलात याला जास्त महत्त्व आहे.
लखलखते तारे पाहण्यासाठी
आपल्याला अंधारातच राहवं लागतं.
सर्वच प्रश्न सोडवून सूटत नाहीत,
काही सोडून दिले की आपोआप सुटतात.
स्वतःचा बचाव करण्याचं
सर्वात प्रभावी साधन म्हणजे,
समोरच्यावर टीका करणं.
समुद्रातील तुफानापेक्षा मनातील
वादळे अधिक भयानक असतात.
ती निर्माण होऊ देऊ नका.
भुतकाळ आपल्याला आठवणींचा आनंद देतो;
भविष्यकाळ आपल्याला स्वप्नांचा आनंद देतो
पण आयुष्याचा आनंद फक्त वर्तमानकाळच देतो.
नेहमी लक्षात ठेवा,
आपल्याला खाली खेचणारे लोक,
आपल्यापेक्षा खालच्या पायरीवर असतात.
जगाशी प्रामाणिक राहण्यापेक्षा
आधी स्वतःशी प्रामाणिक रहा.
हातावरील रेषेत दडलेले भविष्य बघू नका;
त्याच हाताने कष्ठ करा व स्वत:चे भविष्य घडवा.
कुणाच्याही दुःखाचा
अनादर करू नये.
प्रत्येकजण आपापल्या
संकटांशी झगडत असतो..
काहींना आपल्या वेदना लपवता येतात,
काहींना नाही.
लक्षात ठेवा-आयुष्यात कुठलीच गोष्ट
कायमची आपली नसते.
तुम्ही आयुष्यात किती माणसे जोडली
यावरुन तुमची श्रीमंती कळते.
खोटं बोलणाऱ्या,
फसवणाऱ्या,
व अपमान करणाऱ्या,
लोकांमध्ये राहण्यापेक्षा एकटं
राहिलेलं बरं.
यश न मिळणे याचा अर्थ
अपयशी होणे असा नाही.
मनाची श्रीमंती ही
कुठल्याही श्रीमंतीपेक्षा मोठी असते.
आयुष्यातले काही क्षण हे एकांतात
घालवत जा,
सर्व प्रश्नांची उत्तरं तिथेच मिळतील
कारण, तिथेच आपला संवाद फक्त
आणि फक्त स्वतःशी होतो.
स्वत:च्या स्वार्थासाठी दुसऱ्याचा वापर कधी करु नका;
आणि स्वत:चा वापर कुणाला करु देऊ नका.
तुम्ही जेवढं इतरांना द्याल तेवढंच,
किंबहुना त्याच्या कित्येक पटीने देव तुम्हाला देईल.
Life Quotes in Marathi
पुढे पाहत चालावे तर पायात काटे टोचतात,
आणि पायात काटे टोचतात म्हणून
खाली पाहत चालावे तर वाटच चुकते,
प्रवासाची दिशाच बदलून जाते
कदाचित यालाच जीवन म्हणतात वाटत.
कोणत्याही मनुष्याची सध्याची स्थिती पाहून,
त्याच्या भविष्याची टर उडवू नका.
कारण, काळ इतका ताकदवान आहे कि,
तो एका सामान्य कोळशालाही
हळू हळू हिऱ्यात बदलतो.
उद्याचं काम आज करा
आणि आजचं काम आत्ताच करा.
तुमचा जन्म गरीब घरात झाला
हा तुमचा दोष नाही,
पण तुम्ही गरीब म्हणूनच मेलात
तर तो तुमचाच दोष आहे.
आयुष्यात नशीबाचा भाग फक्त एक टक्का
आणि परिश्रमाचा भाग नव्याण्णव टक्के असतो.
असत्य हे अपंग प्राण्याप्रमाणे असते,
दुसऱ्याच्या आधाराशिवाय ते
कधीच उभे राहू शकत नाही.
ज्याने स्वत:चं मन जिंकलं त्याने जग जिंकलं.
आयुष्यातल्या कोणत्याही क्षणी
क्रोधाचे गुलाम बनू नका.
जीवनाचा अर्थ विचारायचा असेल तर
तो आकाशाला आणि समुद्राला विचारा.
डोक्यावर बर्फ व जीभेवर साखर
असली की सारे प्रश्न आपोआप सुटतात.
माणसाचं छोट दु:ख जगाच्या मोठ्या दु:खात
मिसळून गेलं की त्याला सुखाची चव येते.
प्रवासावरुन केव्हा परतावे
हे ज्याला कळते तोच उत्तम प्रवासी.
जीवनातला अंध:कार नाहीसा
करणारी ज्योत म्हणजे हास्य !
जीवनात पुढे जायचे असेल तर
आपल्या अनावश्यक गरजा
वाढणार नाहीत याची काळजी घ्या.
माणसानं राजहंसासारखं असावं.
आपल्याला जे पटेल तेच घ्यावं,
नाही ते सोडून द्यावं.
आपण पक्षाप्रमाणे आकाशात उडायला शिकलो,
माशाप्रमाणे,समुद्रात पोहायला शिकलो पण
जमिनीवर माणसासारखे वागायला शिकलो का?
Marathi Status on Life
प्रसिध्दी ही अशी बाब आहे जी
कितीही मिळाली तरी
माणसाची तहान भागत नाही.
जो धोका पत्करण्यास कचरतो,
तो लढाई काय जिंकणार !
लोखंडाने सोन्याचे कितीही तुकडे केले
तरी सोन्याची किंमत कमी होत नाही.
लबाडी ही तोकड्या चादरीसारखी असते.
तोंडावर ओढुन घ्यावी तर
लगेच खाली पाय उघडे पडतात.
आवड असली की
सवड आपोआप मिळते.
विचार कराण्यासाठी वेळ द्या.
पण एकदा का कृती करण्याची वेळ
आली की विचार करणे थाबंवा
आणि स्वतःला कार्यात झोकून द्या.
अपमानाच्या पायऱ्यावरुनच
ध्येयाचा डोंगर चढायचा असतो.
समजवण्यापेक्षा समजून घेण्यामधे
खरी परीक्षा असते,
कारण समजवण्यासाठी अनुभवाचा कस लागतो,
तर समजुन घेण्यासाठी मनाचा मोठेपणा लागतो.
शरीर पाण्यामुळे, मन सत्यामुळे
आणि आत्मा ज्ञानामुळे पवित्र राहतो.
कर्तव्याची दोरी नसली की
मनाचा पतंग कुठेही फडफडत राहतो.
अपयश म्हणजे संकट नव्हे;
आपल्याला योग्य मार्गावर आणणारे
ते मार्गस्थ दगड आहेत.
हाव सोडली की मोह संपतो
आणि मोह संपाला की दुःख संपते.
गरूडाइतके उडता येत नाही
म्हणून चिमणी कधी उडण्याचे सोडत नाही.
जीवन जगण्याची कला हीच
सर्व कलांमध्ये श्रेष्ठ कला आहे.
भितीयुक्त श्रीमंत जीवन जगण्यापेक्षा
शांततामय, मानाचे गरीब जीवन चांगले.
आयुष्यातल्या असंख्य समस्यांची,
फक्त दोनच कारणे असतात,
एकतर आपण,
विचार न करता कृती करतो,
किंवा कृती करण्याऐवजी,
फक्त विचारच करीत बसतो.
जीवनात तीन प्रकारच्या लोकांना कधीच विसरायचे नाही,
१) ज्यांनी तुम्हाला तुमच्या अडचणीच्या वेळी मदत केली
२) ज्यांनी तुमच्या अडचणीच्या वेळी पळ काढला आणि
३) ज्यांनी तुम्हाला अडचणीत आणले.
जीवनात सुख दुःख दोन्ही
आपण स्वीकारलेच पाहिजेत,
कारण ती आपणच
निर्माण केलेली आहेत..
हे सूत्र लक्षात घेतले तर,
मनुष्य सरळ वागू शकेल.
जेव्हा काही लोक आपली
फक्त गरज लागल्यावर आठवण काढतात,
तेव्हा वाईट वाटून घेऊ नका उलट गर्व करा,
कारण एका मेणबत्तीची आठवण
फक्त अंधार झाल्यावरच येते.
Marathi Shayari on Life
जग नेहमी म्हणते,
चांगले लोक शोधा आणि,
वाईट लोकांना सोडा..
पण भगवान श्रीकृष्ण म्हणतात,
लोकांमध्ये चांगले शोधा व,
वाईट दुर्लक्षित करा कारण,
कोणीही सर्वगुण संपन्न
जन्माला येत नाही!
कधी कधी संकटे आली की,
२ पावले मागे सरकनेच हिताचे असते,
वाघ २ पावले मागे सरकतो तो मागे हटण्यासाठी नव्हे,
तर पुढे झेप घेण्यासाठी.
थोडे दुःख सहन करुन दुसऱ्याला सुख मिळत असेल
तर आपण थोडे दुःख सहन करायला काय हरकत आहे.
सुख हे दुःखाचे मोल देऊनच मिळते.
कर्तव्य, कर्ज, उपकार
या ती गोष्टींचं कधीच विस्मरण
होऊ देऊ नये.
आपण आपल्या स्वतःबद्दल कधी वाईट
विचार करू नका कारण,
देवाने या कामाचा ठेका
नातेवाईक आणि शेजारच्यांनी देऊन ठेवलाय.
पाहिलेल्या पावसाळ्यापेक्षा अनुभवलेले
पावसाळे अधिक महत्त्वाचे असतात.
योग्य निर्णय घ्यायचे,
तर हवा अनुभव..
जो मिळतो,
चुकीचे निर्णय घेऊनच!
गरजेनुसार जीवन जगा इच्छेनुसार नाही,
कारण गरज तर गरीबांची पूर्ण होते,
इच्छा ही श्रीमंत जरी असला तरी अपूर्णच राहते.
अंधारच नसता तर चमकणाऱ्या ताऱ्यांना
काही किंमतच उरली नसती.
अज्ञानाची फळे नश्वर असतात.
ती सकाळी जन्माला येतात
आणि सायंकाळी नष्ट होतात.
प्रेमळ माणसं ही,
इंजेक्शन सारखी असतात,
ते तुम्हाला कधी वेदना देतीलही,
पण उद्देश तुमची
काळजी घेणं हाच असतो.
जीवनात काहीच
कायमस्वरूपी नसते.
नाही चांगले दिवस,
नाही वाईट दिवस.
क्रोधाच्या एका क्षणी संयम राखला
तर पश्चातापाचे शंभर क्षण वाचतात.
लोकांचे तुमच्याबद्दल काय मत आहे
यापेक्षा तुमचे स्वतःबद्दल
काय मत आहे हे महत्त्वाचे.
इच्छा दांडगी असली की मदत
आपणहून तुमच्याकडे चालत येते.
संयम राखणे हा
आयुष्यातला फार मोठा गुण आहे.
जगाला काय आवडते ते करू नका,
तुम्हाला जे वाटते ते करा,
कदाचित उद्या तुमचे वाटणे,
जगाची “आवड” बनेल.
Marathi Whatsapp Status on Life
अन्याय करणे हे पाप आणि
होणारा अन्याय सहन करणे किंवा
उघड्या डोळ्यांनी पाहणे हे महापाप !
विश्वास एखाद्यावर इतका करा की,
तुम्हाला फसवतांना ते स्वतःला दोषी समजतील.
कोणी कौतुक करो वा टीका लाभ तुमचाच आहे,
कौतुक प्रेरणा देते,
तर टीका सुधरण्याची संधी देते.
आनंदापेक्षाही मोठा असा एक आनंद आहे..
तो त्यालाच मिळतो,
जो स्वतःला विसरून इतरांना आनंदित करतो.
जे दुसऱ्याचे स्वातंत्र्य हिरावून घेतात,
त्यांना स्वातंत्र्यात राहण्याचा हक्क नाही.
ज्याच्या जवळ सुंदर विचार असतात,
तो कधीही एकटा नसतो.
झाडासारखे जगा… खूप उंच व्हा…
पण जीवन देणाऱ्या मातीला विसरू नका.
आयुष्यात तुम्ही किती आनंदी आहात,
ते महत्वाचं नाही,
तुमच्यामुळे किती जण आनंदी आहेत,
याला महत्व आहे.
प्रत्येकाशी प्रेमानेच वागले पाहिजे,
जे आपल्याशी वाईट वागतात,
त्यांच्याशीही प्रेमानेच वागले पाहिजे,
ते चांगले आहेत म्हणून नाही,
तर आपण चांगले आहोत म्हणून.
आपल्या आयुष्यात,
एखाद्या व्यक्तीला आपली ‘गरज’ बनवू नका !
कारण जेव्हा ते बदलतात,
तेव्हा तुम्हाला त्या व्यक्तीचा राग
कमी पण स्वतःचा जास्त राग येतो !
किती दिवसाचे आयुष्य असते,
आजचे अस्तित्व उद्या नसते,
मग जगावं ते हासून-खेळून,
कारण या जगात उद्या काय होईल,
ते कुणालाच माहित नसते.
सरकारी बसमध्ये बसायला – नको,
(Government) सरकारी शाळेत शिक्षण – नको,
सरकारी दवखाण्यात उपचार – नको,
मुलीला मात्र नवरा फक्त…
“सरकारी नोकरीवालाच पाहिजे”
जी व्यक्ती तुमच्या प्रगतीवर जळते,
त्यांचा तिरस्कार कधीच करू नका,
कारण ती व्यक्ती स्वतःपेक्षा तुम्हाला
उत्कृष्ट व्यक्ती समजून जळत असते.
जीवनात चांगला माणूस होण्यासाठी,
एवढेच करा.
चुकलं तेव्हा माफी मागा,
आणि कुणी चुकलं तर माफ करा.
जीवनात त्याच गोष्टी करण्यात मजा
आहे ज्या गोष्टीला लोक म्हणतात की,
हे तुला कधीच जमणार नाही.
आयुष्यातील सर्वात सोपा नियम:
जे तुमच्यासोबत होऊ नये असे वाटते,
ते इतरांसोबत करू नका.
Also Read: