Love Status in Marathi
|

Love Status in Marathi | 1200+ लव्ह स्टेटस मराठी

जर आपणही प्रेम केले असेल व आपल्या भावना समोरच्या व्यक्तीला सांगता येत नसतील तर हा Love Status in Marathi संग्रह आपले प्रेम व्यक्त करण्यासाठी आपली मदत करेल. लव्ह स्टेटस मराठी च्या मदतीने आपल्या प्रेमाच्या भावना अनोख्या अंदाजात व्यक्त करा व आपण ज्याच्यावर प्रेम करतो त्या व्यक्तीला जाणवून द्या कि तुम्ही किती रोमँटिक आहात.

Marathi Love Status

तू साधा आहेस पण,
खरंच माझा आहेस.

ओढ म्हणजे काय ते,
जीव लागल्याशिवाय समजत नाही.
विरह म्हणजे काय ते,
प्रेमात पडल्याशिवाय समजत नाही.
प्रेम म्हणजे काय ते,
स्वतः केल्याशिवाय समजत नाही.

गालावर खळी नको तिच्या,
फक्त जरा हसरी मिळावी..
चंद्राइतकी सुंदर नकोच,
फक्त परी लाजरी मिळावी.

हळुवार जपून ठेवलेले क्षण,
तेच माझ्या जगण्याची आस आहे,
एकेक साठवून ठेवलेली आठवण,
तिच माझ्यासाठी खास आहे.

तुझ्या अगोदरही कोणी नव्हते,
तुझ्या नंतरही कोणी नसेल,
जो पर्यंत श्वासात श्वास आहे,
माझे प्रेम फक्त तुझ्यावर असेल.

नदीला या काठ दे..
वाटेला माझ्या वाट दे..
अडकलाय गं तुझ्यात जीव माझा,
आता फक्त आयुष्यभराची साथ दे.

कुठे जाणार सोडून तुला,
जिव माझा तूच आहेस,
कोणी काहीही म्हणू दे,
माझ्या मनात तूच आहेस.

माणूस मनापासून खुश फक्त,
त्याच व्यक्तीसोबत राहु शकतो..
ज्याच्यावर तो प्रेम करत असतो.

तु माझ्या नशिबात आहेस कि नाही,
हे मला माहित नाही पण,
तु जोपर्यंत माझ्या हृदयात आहेस,
तोपर्यंत मी देवाकडे फक्त तुलाच मागेन.

तुला रडवायचं आहे तितकं रडव,
पण साथ सोडू नको..
कारण मी रडायला तयार आहे,
पण तुझी साथ सोडायला नाही.

तु मला विसरशील हा,
माझ्या आयुष्यातील दुःखाचा दिवस असेल.
पण मी तुला विसरेन हा,
माझ्या जीवनातील शेवटचा दिवस असेल.

कोणाला मिळवणे याला
प्रेम म्हणत नाहीत तर
कोणाच्या तरी मनात आपली
जागा निर्माण करणे म्हणजेच
तर खरे प्रेम.

स्वप्नांतल्या राजकुमार बरोबर,
Replace मला करशील का.!
आणि ह्या वेड्याच्या आयुष्यात,
स्वप्नपरी म्हणून अवतरशील का !

लव्ह स्टेट्स मराठी

तुच माझी रूपमती,
सर्व मैत्रिणीत तुच सौंदर्यवती,
म्हणून केली मी तुझ्यावर प्रीती,
कधी बनशील तु माझी सौभाग्यवती.

प्रेम सर्वांवर करा,
पण त्या व्यक्तीवर सर्वात जास्त प्रेम करा,
ज्याच्या हृदयात तुमच्यासाठी
तुमच्या पेक्षा जास्त प्रेम असेल.

आपले प्रेम हे एक फुल आहे,
ज्याला मी तोडू शकत नाही,
आणि सोडूही शकत नाही,
कारण तोडले तर सुकून जाईल,
आणि सोडले तर, दुसरा कोणी घेऊन जाईल !

जर कधी आयुष्यामध्ये
तुम्हाला दुसऱ्यांदा प्रेम झाले…
तर, मग दुसरं प्रेम निवडा,
कारण,
जर तुमचे पहिले प्रेम खरे असते तर..
दुसरे प्रेम झालेच नसते !

तुझा होतो तुझा आहे,
आयुष्यभर तुझाच राहीन..
तु परत यायचं वचन दे,
मी उभा जन्म वाट पाहीन.

मी “तुझी” आहे का नाही..
“हे मला नाही माहीत..”
पण,
“तू” “फक्त” आणि “फक्त”
“माझा” आहेस हे लक्षात ठेव”.

प्रेमात जीव द्यायचा नसतो,
Premt प्रेमात जीव घ्यायचा नसतो,
प्रेमात तर जोडीदाराला,
जीव लावायचा असतो.

जो व्यक्ती खूप भांडणे करूनही
तुम्हाला मनवायची क्षमता ठेवतो.
समजून जा कि तोच व्यक्ती,
तुमच्यापेक्षा तुमच्यावर जीवापाड प्रेम करतो.

तुझ्या सोबतीत घालवलेले ते क्षण आठवतात मला,
त्या जुन्या दिवसांमध्ये परत घेऊन जातात मला,
तुझ्या सहवासात दिवस कधी संपतात हेच समजत नव्हते मला,
तु फक्त सोबत असावी हे हवे होते मला.

तुला हसवण्यापेक्षा,
तुला रडवणे, मला पसंत आहे..
मिठीत घेऊन तुला समजावण्यात,
एक वेगळाच आनंद आहे !

कधीतरी त्यांना पण
साथ देऊन बघा ज्यांचं हृदय,
आधीच कोणीतरी तोडलं आहे..
ते आयुष्यात तुम्हाला,
कधीच नाही सोडणार.

प्रेम असो वा मैत्री,
जर हृदयापासून केली तर,
त्याच्याशिवाय आपण
एक मिनीट पण राहु शकत नाही.

तुझ्याशिवाय माझ्या जीवनात कुणी नसावे,
मी स्वतःला हरवुन जाईन तुझ्यात,
एवढे तुझे माझ्यावर प्रेम असावे.

मराठी लव्ह स्टेट्स

खरं प्रेम काय असतं हे आता मला कळालंय,
माझ्यावर माझ्याएवढेच प्रेम करणारं
आता कोणीतरी मला मिळालंय.

खरं प्रेम काय असतं हे आता मला कळालंय,
माझ्यावर माझ्याएवढेच प्रेम करणारं
आता कोणीतरी मला मिळालंय.

प्रेम हे तेव्हाच टिकते
जेव्हा ते दोघांनाही हवे असते
मग ते टिकवण्यासाठी
दोघे भांडतातही आणि
दोघे समजूनही घेतात.

ते आयुष्यच काय, ज्यात प्रेम नाही.
ते प्रेमच काय, ज्यात आठवणी नाही.
त्या आठवणीच काय, ज्यात तू नाही.
आणि, ती तूच काय, ज्यात मी नाही.

तू सोबत असतांना आयुष्य खूप छान वाटतं,
तुला हसतांना पाहिलं ना कि बस पाहताच राहू वाटतं,
कधी बेधुंद कधी बेभान वाटतं,
खरंच तू सोबत असतांना आयुष्य खूप छान वाटतं.

एक गोष्ट मला अजूनही समजली नाही,
“त्रास” प्रेम केल्याने होतो की,
आठवण आल्याने.

अजूनही जीवन जगत आहे,
कारण माझा श्वास आहे तू,
तू जरी माझी नसलीस तरी,
माझं पहिलं प्रेम आहे तू.

माझी आवड आहेस तू,
माझी निवड आहेस तू,
कसं सांगू तुला पिल्लु,
माझं पहिलं प्रेम आहेस तू.

प्रेम कधी पहिलं नसतं,
आणि कधी शेवटचं नसतं,
कारण प्रेम केव्हाही होउ शकतं,
कारण प्रेम फक्त प्रेम असतं.

प्रेम तुझ्यावर खुप केलं,
पण तुला सांगु शकलो नाही..
तु एकटी असतांना सुद्धा,
प्रेमाचा होकार मागु शकलो नाही.

तुझी वाट पाहतांना दिवस संपतात,
पण माझं वाट पाहणं संपत नाही.

माहित नाही की तुझ्यात
असं काय वेगळं आहे..
तू असलीस की वाटतं माझ्या
जवळ सगळं आहे..!

प्रेम म्हणजे
समजली तर भावना आहे,
केली तर मस्करी आहे,
मांडला तर खेळ आहे,
ठेवला तर विश्वास आहे,
घेतला तर श्वास आहे,
रचला तर संसार आहे,
निभावले तर जीवन आहे.

प्रेम म्हणजे
समजली तर भावना आहे,
केली तर मस्करी आहे,
मांडला तर खेळ आहे,
ठेवला तर विश्वास आहे,
घेतला तर श्वास आहे,
रचला तर संसार आहे,
निभावले तर जीवन आहे.

मागून बघ जीव,
मी नाही म्हणणार नाही,
पण नको करू माझ्या प्रेमाची मस्करी,
मी पुन्हा कधी मिळणार नाही.

प्रेम स्टेटस मराठी

आयुष्यभर मला तुझ्या सोबत राहायचंय,
प्रत्येक क्षण तुझ्या सोबत जगायचंय,
हातामध्ये घेऊन हात तुझा,
आयुष्याची वाट संपेपर्यंत चालायचंय.

तुझ्यासाठीच जगायचंय मला,
tujya तुझ्या हृदयात रहायचंय मला,
tu.. तुझ्या सुखात जोडीदार,
तुझ्या दुःखात भागीदार व्हायचंय मला.

काळजी घेत जा स्वतःची,
कारण माझ्याकडे
तुझ्यासारखी
दुसरी कोणीही नाही.

ती असावी शांत निरागस,
मी कितीही रागावलो तरी माझ्यावर प्रेम करणारी,
माझ्या वेदना समजणारी,
डोळ्यांतून अश्रू ओघळले तरी अलगद टिपणारी,
ती असावी खळखळणाऱ्या नदी सारखी,
वाहत वाहत जाऊन शेवटी मलाच भेटणारी.

मनापासून प्रेम करणारे हवे असते कुणीतरी,
मनामधले ओळखणारे हवे असते कुणीतरी,
मनातले सारे गुज सांगण्यासाठी हवे असते कुणीतरी,
फुलासारखे हळुवार जपणारे हवे असते कुणीतरी.

प्रेम करायचं म्हणाल तर,
कुणाशीही जमत नाही.
मनासारख्या जोडीदारा शिवाय,
संसारात मन रमत नाही.

मोठं होण्यासाठी कधीतरी
लहान होऊन जगावं लागतं,
सुख मिळवण्यासाठी दुःखाच्या सागरात पोहावं लागतं,
मनापासून प्रेम करणारा कधीच वेडा नसतो,
कारण ते ‘वेड’ समजून घेण्यासाठी,
कधीतरी मनापासून ‘प्रेम’ करावं लागतं.

आयुष्य थोडंच असावं,
पण जन्मो जन्मी
तुझंच प्रेम मिळावं.

माझं प्रेम तुला कधी
कळलंच नाही,
मी वाट पाहत राहिलो, पण
तुझं पाऊल कधी वळलंच नाही.

मी दुनिया बरोबर लढू शकतो पण,
आपल्या माणसाबरोबर नाही.
कारण,
आपल्या माणसाबरोबर मला ‘जिंकायचे’ नाही,
तर ‘जगायचे’आहे.

आयुष्यभर हसवेन तुला
पण मला कधी रडवून जाऊ नकोस,
काळजी घेईन तुझी
पण मला कधी सोडून जाऊ नकोस.

वेळ लागला तरी चालेल,
पण वाट तुझीच पाहीन,
तू विसरली तरी चालेल,
पण मी नेहमी तुझाच राहीन.
तुझाच एक प्रेम वेडा !

तू सोबत असतांना तुझे
बोलणे ऐकायला आवडते..
तू सोबत नसतांना तुझे
बोलणे आठवायला आवडते.

वाळू वर कोरलेलं नाव
एका क्षणात जाईल.
पण,
काळजात कोरलेलं नाव
मरेपर्यंत जाणार नाही.

एकतर्फी प्रेम स्टेटस मराठी

कधी इतकं प्रेम झालं काही कळलंच नाही,
कधी इतकं वेड लावलं काही कळलंच नाही,
पहिल्यांदा कधी आवडलीस हे खरंच आठवत नाही,
पण आठवण काढल्याशिवाय आता खरंच राहवत नाही.

आज डोळ्यांना रडावेसे वाटते,
आठवणीत तुझ्या रमावेसे वाटते,
इतके प्रेम केलेस तु माझ्यावर,
की आयुष्यभर तुलाच पाहावेसे वाटते.

तुझं हे एक बरं असतं,
थोडंसं रडतेस.
बाकी सारं काही
माझ्यावर सोडतेस.

वाट पाहणे तुझी,
हाच राहिला एक ध्यास.
दुसरा विचार नाही मी करत,
तूच जीवन तूच आहेस श्वास.

एक क्षण लागतो कोणालातरी हसवण्यासाठी,
एक क्षण लागतो कोणालातरी रडवण्यासाठी,
पण फक्त एक नजर लागते प्रेम करण्यासाठी,
आणि आयुष्य लागते त्याला विसरण्यासाठी.

प्रेम कधीच वाईट नसतं गं,
तरी लोक त्याला नावे ठेवतात,
आणि, नावे ठेवणारी माणसेच,
नकळत कधीतरी प्रेमात पडतात.

आयुष्यभर साथ द्यायची कि नाही,
हा निर्णय तुझा आहे.
पण मरेपर्यंत तुझी साथ देईल,
हा शब्द माझा आहे.

तुझ्यात गुंतते तुझ्यात रमते,
सतत स्वतःला तुझ्यातच पाहते,
तुझी ती प्रेमळ नजर,
माझ्याकडे पाहून मला सारखी खुणावते,
आणि पुन्हा नव्याने तुझ्या प्रेमात पाडते.

मी काहीही बोलत नाही याचा अर्थ
Mi मी चुकलोय असा नाही,
मी तुझ्यासाठी शांत आहे,
कारण तुला गमवायची माझ्यात हिम्मत नाही.

प्रेम हे होत नसतं,
प्रेम हे करावं लागतं,
आपलं असं कुणी नसतं,
आपलंस करावं लागतं.

ते म्हणतात प्रेम जर खरे असेल तर,
ते परत तुमच्याकडे येते,
पण मी म्हणतो प्रेम जर खरे असेल तर,
ते आपल्याला कधीच सोडून जात नाही.

त्या वेडीनी प्रपोज़ पण असा केला की,
मी तिला नाही म्हणूच शकलो नाही..
मला म्हटली चल टॉस करूया,
छापा पडला तर तु माझा आणि
काटा पडला तर मी तुझी.

Love Status in Marathi

तुझ्यावर प्रेम करणं
बरोबर आहे की नाही मला माहित नाही,
पण तुझ्यावर प्रेम करायला खूप आवडतं..
कधी आपण सोबत असू किंवा नसू,
पण हे स्वप्न पहायला खूप आवडतं.

वेडया मनाला माझ्या,
तुझ्याशिवाय आता काही सुचतच नाही..
तू, तू अन फक्त तूच,
तुझ्याशिवाय दुसरे काही दिसतच नाही..
अबोल हि प्रीत माझी,
तुला का कधीच कळत नाही..
अन वेडे हे मन माझे,
तुला पाहिल्याशिवाय काही राहवतच नाही.

भरपूर वेळ झाला तरी तू,
आली पण नाही..
तू येशील म्हणून मी,
कुठे गेलो पण नाही.

प्रेम कधीच अशा माणसाला शोधत नाही,
ज्याच्या बरोबर राहायचंय.
प्रेम अशा माणसाला शोधते ज्याच्यशिवाय,
राहू शकणार नाही.

जर आयुष्य असेल तर,
तुझ्या सोबत असू दे.
आणि,
जर मृत्यू असेल तर,
तुझ्या अगोदर असू दे.

ते आयुष्यच काय, ज्यात प्रेम नाही.
ते प्रेमच काय, ज्यात आठवणी नाही.
त्या आठवणीच काय, ज्यात तू नाही.
आणि, ती तूच काय, ज्यात मी नाही.

रोज रोज त्रास होतो
तुझ्यापासून दूर राहण्याचा.
कधी खेळ हा थांबेल
संदेशाद्वारे बोलण्याचा.

जर मी तुझी वाट पाहत बसलो आहे तर
ह्याचा अर्थ असा नाही की,
माझ्याकडे काहीच काम नाहीये..
ह्याचा अर्थ असा की,
माझं कोणतेही काम तुझ्यापेक्षा महत्वाचं नाहीये.

एके दिवशी माझा श्वास बंद होईल,
नको विचार करुस की माझे प्रेम कमी होईल..
अंतर फक्त एवढं असेल,
आज मी तुझी आठवण काढत आहे,
उद्या माझी आठवण तुला येईल.

माझ्या आयुष्यात प्रेमाची सुरुवात
तू केलीस तर, माझी इच्छा आहे की,
शेवट पण तूच करावा…!

तुझ्यावर असे प्रेम करेन की,
तुझ्या जिवनात भलेही माझी जागा
दुसरं कोणीही घेईल पण,
तुझ्या ह्रदयातील माझी जागा,
कधीच कोणी घेऊ शकनार नाही.

Also Read:

https://sheroshayari.net/love-shayari-in-hindi/

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *