Good Night Messages Marathi | 1200+ शुभ रात्री शुभेच्छा संदेश मराठी मध्ये
रात्री झोपण्याच्या अगोदर आपण सर्वजण Good Night Messages Marathi आपल्या मित्रांना व नातेवाईकाना शेअर करतो. आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय खास शुभ रात्री शुभेच्छांचा खजिना. 1200+ पेक्षा जास्त शुभ रात्री शुभेच्छा संदेश मराठी मध्ये फक्त आपल्यासाठी.
Good Night Messages Marathi
दुःखाच्या रात्री झोप कुणालाच लागत नाही,
आणि सुखाच्या आनंदात कुणीही झोपत नाही,
यालाच जीवन म्हणतात..
शुभ रात्री!
गर्व करून कुठल्याही नात्याला तोडण्यापेक्षा,
माफी मागून ती नाती जपा,
कारण वेळ आल्यावर पैसा नाही तर,
माणसंच साथ देतात!
शुभ रात्री !
आपली खरी स्वप्न तीच आहेत जी आपल्याला
रात्री उशिरापर्यंत जगण्यास आणि
सकाळी लवकर उठण्यास भाग पाडतात.
मांजरीच्या कुशीत लपलंय कोण?
इटुकली पिटुकली पिल्ले दोन!
छोटे छोटे डोळे, इवले इवले कान,
पांघरून घेऊन झोपा आता छान.
शुभ रात्री!
आयुष्यात कितीही चांगली कर्म करा,
पण कौतुक हे स्मशानातच होतं.
शुभ रात्री !
जिंकणे म्हणजे नेहमी फक्त पहिला येणे असे नसते,
एखादी गोष्ट पूर्वीपेक्षा
जास्त चांगली करणे म्हणजेच जिंकणे होय.
जेव्हा कमवायला लागलो तेव्हा समजले..
वडिलांच्या पैशावर चैन करता यायची,
स्वतःचा पैशामध्ये तर गरज ही नीट पुर्ण होत नाही.
शुभ रात्री !
उद्याचा दिवस पाहण्यासाठी,
आपण सगळेच जण झोपतो..
पण कुणीच हा विचार करत नाही,
आपल्यामुळे आज ज्याचे मन दुखावले गेले,
त्याला झोप लागली का.?
शुभ रात्री!
जगा इतकं कि आयुष्य कमी पडेल,
हसा इतके कि आनंद कमी पडेल,
काही मिळाले तर नशिबाचा खेळ आहे,
पण प्रयत्न इतके करा कि,
परमेश्वराला देणे भागच पडेल.
जेव्हा आपण लोकांना वेळ देतो,
तेव्हा त्यांना असं वाटतं की,
आपण नेहमी Free असतो,
पण त्यांना हे कळत नाही की,
आपण फक्त त्यांच्या साठी वेळ काढतो.
शुभ रात्री !
Good Night msg Marathi
चांदणं चांदणं, झाली रात,
चांदणं चांदणं, झाली रात,
आता झोपा की,
कोणाची बघता वाट.
शुभ रात्री!
सत्य आणि स्पष्ट बोलणारा
कडू वाटत असला तरी,
तो धोकेबाज कधीच नसतो.
शुभ रात्री !
प्रत्येकावर विश्वास ठेवू नका,
कारण साखर आणि मीठ
दोघांना एकच रंग आहे!
शुभ रात्री !
रात्रीच्या निशब्द पणात सुद्धा काही शब्द आहेत,
चांदण्यांच्या शितल पणात सुद्धा काही काव्य आहे,
काळोख पडला रात्र झाली म्हणून इतक्यात झोपू नका,
कारण सारे जग विश्रांती घेत असतांना,
कुणीतरी आपली गोड-गोड आठवण काढत आहे.
शुभ रात्री!
आयुष्यात कधीही कोणासमोर
स्वतःच स्पष्टीकरण देत बसू नका,
कारण ज्यांना तुम्ही आवडता,
त्यांना स्पष्टीकरणाची अजिबात गरज नसते,
अन ज्यांना तुम्ही आवडत नाही ते
तुमच्या स्पष्टीकरणावर कधीच
विश्वास ठेवायला तयार होत नाही.
जग गरजेच्या नियमानुसार चालत असते,
थंडीत ज्या सूर्याची वाट बघितली जाते,
उन्हाळ्यात त्याच सूर्याचा तिरस्कार केला जातो!
तुमची किंमत तेव्हा होईल,
जेव्हा तुमची गरज लक्षात येईल!
शुभ रात्री !
तुझ्या सहवासात,
रात्र जणू एक गीत धुंद,
प्रीतीचा वारा वाहे मंद,
रातराणीचा सुगंध,
हरवावे वाटते तुझ्या कुशीत,
करून पापण्यांची कवाडे बंद.
शुभ रात्री!
खूप Strong असतात
ती लोकं.
जे सर्वांपासून लपून,
एकट्यात रडतात.
शुभ रात्री !
छत्री पावसाला थांबवू शकत नाही,
पण पावसात थांबण्याचे धाडस नक्की देऊ शकते,
तसेच आत्मविश्वास यशस्वी होण्याची खात्री
देऊ शकत नाही पण,
संघर्ष करण्याची प्रेरणा नक्की देऊ शकतो.
जो तुमच्या आनंदासाठी हार मानतो,
त्याच्याशी तुम्ही कधीच जिंकू शकत नाही.
शुभ रात्री !
Good Night Quotes in Marathi
चांदण्या रात्री तुझी साथ,
माझ्या हाती सख्या तुझाच हात.
अशी रात्र कधी संपूच नये,
सूर्य सुद्धा लपून रहावा त्या गोड अंधारात..
शुभ रात्री!
आपले दुःख मोजक्या १ टक्का माणसांजवळच व्यक्त करा
कारण ५० टक्के लोकांना काही पर्वा नसते
आणि ४९ टक्के लोकांना
तुम्ही अडचणीत आहेत याचा आनंदचं होतो.
आयुष्यात कधीही कोणासमोर
स्वतःच स्पष्टीकरण देत बसू नका..
कारण ज्यांना तुम्ही आवडता त्यांना
स्पष्टीकरणाची अजिबात गरज नसते..
अन ज्यांना तुम्ही आवडत नाही,
ते तुमच्या स्पष्टीकरणावर
कधीच विश्वास ठेवायला तयार होत नाही.
शुभ रात्री !
लाईफ छोटीशी आहे,
“लोड” नाही घ्यायचा.
मस्त जगायचे आणि,
“उशी” घेऊन झोपायचे.
गुड नाईट!
विश्वास नावाचा पक्षी एकदा उडाला,
कि तो परत कधीच बसत नाही.
शुभ रात्री !
तुम्ही आयुष्यात काय कमावले याच्यावर
कधी गर्व करू नका कारण
बुद्धिबळाचा खेळ संपला कि सगळे मोहरे आणि राजा
एकाच डब्ब्यात ठेवले जातात.
कोणताही व्यक्ती वाईट स्वभावाचा नसतो,
फक्त आपले विचार त्याच्याशी
न पटल्यास आपल्याला तो वाईट वाटायला लागतो…
शुभ रात्री !
चांगली झोप लागावी म्हणून,
गुड नाईट…
चांगले स्वप्न पडावे म्हणून,
स्वीट ड्रीम्स.
आणि,
स्वप्न पाहतांना बेड वरून पडू नये म्हणून,
टेक केअर.
कधी कोणावर जबरदस्ती करू
नका की त्याने तुमच्या साठी
वेळ काढावा,
जर त्या व्यक्तीला खरंच तुमची
काळजी असेल तर तो स्वतःहून
तुमच्यासाठी वेळ काढेल…
शुभ रात्री !
आयुष्यात आनंदाने जगायचे असेल तर
दोनच गोष्टी विसरा
तुम्ही इतरांसाठी जे चांगले केले ते
व इतरांनी तुमच्याशी वाईट केले ते.
सरडा तर नावाला बदनाम आहे,
खरा रंग तर माणसं बदलतात…
शुभ रात्री !
कधी कधी वाटत कि,
आपण उगाचच मोठे झालो.
कारण तुटलेली मनं आणि अपुरी स्वप्नं
यापेक्षा तुटलेली खेळणी आणि अपुरा गृहपाठ
खरच खुप चांगला होता.
शुभरात्री!
Good Night Marathi SMS
खोट्या वचनापेक्षा स्पष्ट नकार
नेहमी चांगला असतो…
शुभ रात्री !
कोणी आपल्याला फसवलं
या दुःखापेक्षा,
आपण कोणाला फसवलं नाही,
याचा आनंद काही वेगळाच असतो…
शुभ रात्री !
किंमत पैशाला कधीच नसते..
किंमत पैसे कमावतांना केलेल्या,
कष्टाला असते…
शुभ रात्री !
दुःखात देवाला आठवण्याचा हक्क,
त्यांनाच असतो. ज्यांनी सुखात त्याचे..
आभार मानलेले असतात…
शुभ रात्री !
सर्वात मोठं वास्तव..
लोक तुमच्याविषयी चांगलं ऐकल्यावर
संशय व्यक्त करतात,
परंतु वाईट ऐकल्यावर मात्र,
लगेच विश्वास ठेवतात…
शुभ रात्री !
खोटं ऐकायला तेव्हा मजा येते,
जेव्हा सत्य अगोदरच माहित असतं…
शुभ रात्री !
रात्र नाही स्वप्नं बदलते,
दिवा नाही वात बदलते,
मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी,
कारण नशीब बदलो ना बदलो,
पण वेळ नक्कीच बदलते…
शुभ रात्री !
या जगात सगळ्या गोष्टी सापडतात.
पण.. स्वतःची चूक कधीच सापडत नाही…
शुभ रात्री !
कधी कधी जीवनात इतके बेधुंद व्हावे लागते,
दुःखाचे काटे टोचुनही खळखळून हसावे लागते,
जीवन यालाच म्हणायचे असते,
दुःख असूनही दाखवायचे नसते,
मात्र पाण्याने भरलेल्या डोळ्यांना
पुसत आणखी हसायचे असते…
शुभ रात्री !
कुणीही चोरू शकत नाही
अशी संपत्ती कमावण्याचा प्रयत्न करा..
ती म्हणजे “नाव” आणि “इज्जत”…
शुभ रात्री !
कुणी विचारलं आयुष्यात काय गेलं आणि काय मिळालं,
सरळ सांगा की, जे गेलं ते कधीच माझं नव्हतं,
जे मिळालं ते देवानं माझ्यासाठीच ठेवलं होतं…
शुभ रात्री !
मनाने इतके चांगले राहा की,
तुमचा विश्वासघात करणारा
आयुष्यभर तुमच्या जवळ येण्यासाठी..
रडला पाहिजे…
शुभ रात्री !
जगात करोडो लोक आहेत,
पण तरीही तुम्ही जन्माला आलात कारण…
“देव तुमच्या कडून,
काही अपेक्षा करत आहे,
जी करोडो लोकांकडून,
पूर्ण होण्याची शक्यता नाही”
स्वतःची किंमत करा…
तुम्ही खूप मौल्यवान आहात!
शुभ रात्री !
Good Night Marathi Status
परिस्थिती विरोधात जाते तेव्हा माघार
घेण्याऐवजी संघर्षाची तयारी करा.
हे कलयुग आहे..
इथे खोट्याला स्वीकारलं जातं,
आणि खऱ्याला लुटलं जातं…
शुभ रात्री !
हसता हसता सामोरे जा आयुष्याला,
तरच घडवू शकाल भविष्याला,
कधी निघुन जाईल “आयुष्य” कळणार नाही,
आताचा हसरा क्षण परत मिळणार नाही…
शुभ रात्री !
नशीब नशीब म्हणतो आपण पण तसं काहीही नसतं,
कर्म करत राहीलं कि समाधान मिळत असतं,
हातावरच्या रेषांच काय तसंही विशेष नसतं,
कारण ज्यांना हातच नसतात भविष्य तर त्यांचही असतं…
शुभ रात्री !
कोणी कौतुक करो वा टीका लाभ तुमचाच आहे,
कौतुक प्रेरणा देते,
तर टीका सुधरण्याची संधी देते…
शुभ रात्री !
फांदीवर बसलेल्या पक्षाला
फांदी तुटण्याची भीती नसते,
कारण त्याला त्या फांदीवर विश्वास नसून,
आपल्या पंखावर विश्वास असतो…
शुभ रात्री !
माणसाने एकदम सुखाने आयुष्य जगावं,
काल आपल्याबरोबर काय घडलं
याचा विचार करण्यापेक्षा,
उद्या आपल्याला काय घडवायचं आहे
याचा विचार करा…
कारण आपण फक्त,
गेलेले दिवस मोजण्यासाठी नाही तर,
उरलेले दिवस आनंदाने
घालवायला जन्माला आलोय…
शुभ रात्री !
एकवेळ शरीराने कमजोर असाल तरी चालेल,
पण मनाने कधीच कमजोर होऊ नये..
शुभ रात्री !
आयुष्यातील सर्वात मोठा आनंद म्हणजे,
जे तुम्हाला जमणार नाही,
असं लोकांना वाटतं,
ते साध्य करून दाखवणं..!
शुभ रात्री !
मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी,
कारण नशीब बदलो ना बदलो,
पण वेळ नक्कीच बदलते…
शुभ रात्री !
Also Read: