Good Morning Messages in Marathi
|

Good Morning Messages in Marathi | 1200+ शुभ सकाळ शुभेच्छा मराठी मध्ये

दररोज सकाळी उठल्या उठल्या आपल्या प्रियजनांना शुभ सकाळ संदेश आपण पाठवतो. प्रत्येक दिवसाची सकाळ हि आपल्यासाठी खास असते, प्रत्येक दिवस हा सगळ्यांसाठी खास दिवस असतो म्हणूनच आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय खास शुभ सकाळ शुभेच्छांचा खजिना Good Morning Message in Marathi जो तुमच्या दिवसाची सुरवात छान करेल.

Good Morning Message in Marathi

कठीण काळात सतत स्वतःला सांगा,
शर्यत अजून संपलेली नाही,
कारण मी अजून जिंकलेलो नाही.

एका मिनिटात आयुष्य बदलू शकत नाही..मात्र,
एक मिनिट विचार करून,
घेतलेला निर्णय आयुष्य बदलू शकतो.
शुभ सकाळ!

ठाम राहायला शिकावं,
निर्णय चुकला तरी हरकत नाही.
स्वतःवर विश्वास असला की,
जिवनाची सुरुवात कुठूनही करता येते.

मैदानात हरलेला माणूस पुन्हा जिंकू शकतो
पण मनातून हरलेला माणूस
कधीच जिंकू शकत नाही.
शुभ सकाळ!

“आयुष्य” अवघड आहे पण,
अशक्य नाही !
शुभ सकाळ!

खेळ’ असो वा ‘आयुष्य’
आपलं सामर्थ्य तेव्हाच दाखवा जेव्हा समोरचा
आपल्याला “कमजोर” समजत असेल.

सिंह बनुन जन्माला आले तरी
स्वतःचे राज्य हे स्वतःच
मिळवावे लागते कारण ह्या जगात
नुसत्या डरकाळीला महत्व नाही.
शुभ सकाळ!

चांगली भूमिका, चांगली ध्येय आणि
चांगले विचार असणारे लोक नेहमी आठवणीत राहतात..
मनातही, शब्दातही आणि आयुष्यातही.
शुभ सकाळ!

एकदा कर्तृत्व सिद्ध झालं कि,
संशयाने बघणाऱ्या नजरा
आपोआप आदरानं झुकतात.

जगा इतकं कि आयुष्य कमी पडेल,
हसा इतके कि आनंद कमी पडेल,
काही मिळाले तर नशिबाचा खेळ आहे,
पण प्रयत्न इतके करा कि,
परमेश्वराला देणे भागच पडेल.

संकटावर अशा प्रकारे
तुटून पडा की,
जिंकलो तरी इतिहास,
आणि,
हरलो तरी इतिहासच..
शुभ सकाळ!

ध्येयासाठी आतोनात प्रयत्न करा,
जगाने तुम्हाला वेडे म्हटले तरी चालेल,
कारण वेडेच लोकं इतिहास घडवतात,
आणि शिकलेली लोकं तो इतिहास वाचतात.

माणसाच्या मुखात गोडवा,मनात प्रेम,
वागण्यात नम्रता आणि
हृदयात गरीबीची जाण असली की…
बाकी चांगल्या गोष्टी आपोआप घडत जातात…!
शुभ सकाळ!

Good Morning Quotes in Marathi

माणसाच्या परिचयाची सुरुवात
जरी चेहऱ्याने होत असली तरी,
त्याची संपूर्ण ओळख,
वाणी, विचार आणि कर्मानेच होते..
शुभ सकाळ!

चांगले लोक आणि चांगले विचार
आपल्या बरोबर असतील तर,
जगात कुणीही तुमचा पराभव
करू शकत नाही.
शुभ सकाळ!

पुन्हा जिंकायची तयारी
तिथूनच करायची
जिथे हरण्याची जास्त भीती वाटते.

नेहमी लक्षात ठेवा
आपल्याला खाली खेचणारे लोक,
आपल्यापेक्षा खालच्या पायरीवर असतात.

धुक्यान एक छान गोष्ट शिकवली की,
जीवनात रस्ता दिसत नसेल तर,
दूरचं पहाण्याचा प्रयत्न करण व्यर्थ असतं,
एक एक पाऊल टाकत चला,
रस्ता आपोआप मोकळा होत जाईल.
शुभ सकाळ!

मोर नाचताना सुद्धा रडतो..
आणि.. राजहंस मरताना सुद्धा गातो..
दुःखाच्या रात्री झोप कुणालाच लागत नाही..
आणि सुखाच्या आनंदात कुणीही झोपत नाही.
यालाच जीवन म्हणतात.
शुभ सकाळ!

काही वेळा आपली चुक नसताना
ही शांत बसणं योग्य असतं…
कारण जो पर्यंत समोरच्याच मन मोकळ होत नाही
तो पर्यंत त्याला त्याची चुक लक्षात येत नाही…!
शुभ सकाळ!

कोणी कोणाच्या आयुष्यात कायमचे राहात नाही
पाने उलटले की जुने काही आठवत नाही
आपण नसल्यान कोणाला आनंद झाला तरी चालेल पण
आपल्या अस्तिवाने कोणालाही दु:ख होता कामा नये.
शुभ सकाळ!

माझ्यामागे कोण काय बोलतं
याने मला काहीच फरक पडत नाही,
माझ्यासमोर काही बोलण्याची त्यांची
हिम्मत नाही, यातच माझा विजय आहे.

या जगात वाट दाखवणारे अनेकजण असतात
पण चालणारे आपण एकटेच असतो,
पडल्यावर हसणारे अनेकजण असतात,
पण मदतीचा हात देणारे ते फक्त जिवलगच असतात.
शुभ सकाळ!

जिवनातील कोणत्याही दिवसाला दोष देऊ नका..
कारण उत्तम दिवस आठवणी देतात,
चांगले दिवस आनंद देतात,
वाईट दिवस अनुभव देतात,
तर अत्यंत वाईट दिवस आपल्याला शिकवण देतात…!
शुभ सकाळ!

यश हे सोपे असते,
कारण ते कशाच्या तरी तुलनेत असते ..!
पण समाधान हे महाकठीण,
कारण त्याला मनाचीच परवानगी लागते..!
शुभ सकाळ !

Good Morning Images in Marathi

सगळीच स्वप्न पुर्ण होत नसतात
ती फक्त पहायची असतात…
कधी कधी त्यात रंग भरायचे असतात
पण स्वप्न पुर्ण झालं नाही तर दुखी व्हायच नसतं..
रंग उडाले म्हणुन चित्र फाडायचं नसतं
फक्त लक्षात ठेवायच असतं
सर्वच काही आपल नसत.
शुभ सकाळ!

आपल्यात लपलेले परके
आणि परक्यात लपलेले आपले
जर तुम्हाला ओळखता आले तर,
आयुष्यात वाईट दिवस पाहण्याची वेळ
आपल्यावर कधीच येणार नाही.
शुभ सकाळ!

आनंद नेहमी चंदनासारखा असतो,
दुसऱ्यांच्या कपाळावर लावला तरी,
आपलीही बोटे सुगंधित करून जातो..
आपला दिवस आनंदी जावो!
शुभ सकाळ!

आई ही जगातली इतकी मोठी हस्ती आहे
कि जिच्या घामाच्या एका थेंबाची सुद्धा परतफेड,
कोणताच मुलगा कोणत्याही जन्मी करू शकत नाही.
शुभ सकाळ!

नाती तयार होतात हेच खूप आहे,
सर्व आनंदी आहेत हेच खूप आहे,
दर वेळी प्रत्येकाची
सोबत होईल असं नाही,
एकमेकांची आठवण काढत आहोत
हेच खूप आहे…
सुप्रभात!

ध्येय दुर आहे म्हणून रस्ता सोडू नका,
स्वप्नं मनात धरलेलं कधीच मोडू नका.
पावलो पावली येतील कठिण प्रसंग
फक्त चंद्र तारकांना स्पर्श करुन
जिंकण्यासाठी जमीनीला सोडू नका
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा!

आनंदापेक्षाही मोठा असा एक आनंद आहे,
तो त्यालाच मिळतो;
जो स्वत:ला विसरून इतरांना आनंदित करतो.
शुभ सकाळ !

थंड पाणी आणि गरम इस्त्री जसे
कपड्यांवरच्या सुरकुत्या घालवतात,
तसेच शांत डोके आणि ऊबदार मन
आयुष्यातील चिंता घालवतात.
शुभ सकाळ!

हरवलेल्या वस्तूही सापडू शकतात.
पण, एकच गोष्ट अशी आहे की
जी एकदा हातातून निसटली की,
कोणत्याही उपायानं पुन्हा मिळू शकत नाही..
आणि ती असते.. “आपलं आयुष्य”..
म्हणूनच.. ….मनसोक्त जगा !
शुभ सकाळ !

Good Morning Marathi SMS

पक्षी जेंव्हा जिवंत असतो,
तेंव्हा तो किड्या मुंग्याना खातो.
पण जेंव्हा पक्षी मरण पावतो,
तेंव्हा तेच कीडे-मुंग्या त्या पक्षाला खातात.
वेळ आणि स्थिती केंव्हाही बदलू शकते.
कोणाचा अपमान करू नका आणि
कोणाला कमीही लेखू नका.
शुभ सकाळ!

चांगल्या गोष्टी त्यांना मिळतात,
जे “वाट” बघतात..
अधिक चांगल्या गोष्टी त्यांना मिळतात,
जे “प्रयत्न” करतात..
पण “सर्वोत्तम” गोष्टी त्यांनाच मिळतात,
जे आपल्या “प्रयत्नांवर” अतूट विश्वास ठेवतात.

भलेही स्वतःची प्रगती कमी झाली तरी चालेल,
पण माझ्यामुळे कोणाचे नुकसान व्हायला नको.
शुभ सकाळ!

कोकिळेच्या मंजुळ सुरांनी,
फुलांच्या हळुवार सुगंधांनी
आणि सूर्याच्या कोमल किरणांनी,
ही सकाळ आपलं स्वागत करत आहे.
शुभ सकाळ !

भाकरीचं गणितंच वेगळं आहे…
कोण ती कमवायला पळतायत तर…
कोण ती पचवायला!
शुभ सकाळ!

हळवी असतात मने,
जी शब्दांनी मोडली जातात..
अन शब्दच असतात जादूगार,
ज्यांनी माणसे जोडली जातात…
शुभ सकाळ!

किती दिवसाचे आयुष्य असते?
आजचे अस्तित्व उद्या नसते,
मग जगावे ते हसून-खेळून कारण
या जगात उद्या काय होईल
ते कोणालाच माहित नसते..
म्हणुन आनंदी रहा.
शुभ सकाळ!

कोकीळेच्या मंजूळ सुरांनी,
फुलांच्या हळुवार सुगंधांनी
आणि सूर्याच्या कोमल किरणांनी,
ही सकाळ आपले स्वागत करत आहे…
शुभ सकाळ !

प्रेम करणारी माणसं या जगात खूप भेटतात,
पण समजून घेणारी आणि
समजून सांगणारी व्यक्ती भेटायला भाग्य लागते.
शुभ सकाळ!

अश्रू असो कोणाचेही,
आपण विरघळून जावे..
नसो कोणीही आपले,
आपण मात्र कोणाचेही व्हावे…
शुभ सकाळ!

जो तुमच्या आनंदासाठी हार मानतो.
त्याच्याशी तुम्ही कधीच जिंकू शकत नाही.
शुभ सकाळ!

तुमचा आजचा संघर्ष तुमचे
उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो
त्यामुळे विचार बदला म्हणजे तुमचे आयुष्य बदलेल.
शुभ सकाळ !

शुभ सकाळ शुभेच्छा संदेश मराठी

एखादी वस्तू वापरली नाही की ती गंजते,
आणि जास्त वापरली तर झिजते..
काहीही झालं तरी शेवट तर ठरलेलाच आहे..
मग कोणाच्याही उपयोगात न येता,
गंजण्यापेक्षा,
इतरांच्या सुखासाठी झिजणे
केव्हाही उत्तमच…!
शुभ प्रभात!

लोक म्हणतात जगण्यासाठी पैसा लागतो,
अहो पैसा तर व्यवहारासाठी लागतो !
जगण्यासाठी लागतात फक्त,
“प्रेमाची माणसं”
अगदी तुमच्यासारखी !
शुभ सकाळ !

पहाट झाली! पहाट झाली!
चिमण्यांची किलबिलाट झाली
अन जाग आली,
त्यातून एक चिमणी
हळूच येऊन कानात म्हणाली,
उठा,
Whatsapp बघायची वेळ झाली !
शुभ सकाळ!

तुम्ही खूप शक्तिशाली असाल,
पण वेळ ही तुमच्यापेक्षाही शक्तिशाली आहे.
एका झाडापासून लाखो
माचिसच्या काड्या बनवता येतात.
पण एक माचिसची काडी
लाखो झाडे जाळून खाक करू शकते.
शुभ सकाळ!

शोधणार आहात तर
काळजी करणारे शोधा कारण
गरजेपुरता वापरणारे
स्वतःच तुम्हाला शोधत येतात !
शुभ सकाळ!

नशिबात असेल तसे “घडेल” या “भ्रमात” राहू नका..
कारण “आपण” जे “करू” त्याचप्रमाणे “नशीब”
घडेल यावर विश्वास ठेवा.
शुभ सकाळ!

“हो” आणि “नाही” हे दोन छोटे शब्द आहेत,
पण ज्याविषयी खूप विचार करावा लागतो,
आपण जीवनात बऱ्याच गोष्टी गमावतो,
“नाही” लवकर बोलल्यामुळे,
आणि, “हो” उशिरा बोलल्यामुळे.
शुभ सकाळ !

जीवनात स्वतःला आलेल्या अपयशाला
कधीच दुसऱ्याला कारणीभूत समजू नका..
कारण दिवा विझायला नेहमी हवाच कारणीभूत नसते,
कधी कधी दिव्यातही तेल कमी असते.
शुभ सकाळ!

डोक शांत असेल तर,
निर्णय चुकत नाहीत,
अन्…भाषा गोड असेल तर,
माणसं तुटत नाहीत.
शुभ सकाळ!

पहाटे पहाटे मला जाग आली;
चिमण्यांची किलबिल कानी आली;
त्यातिल एक चिमणी हळुच म्हणाली;
उठ बाळ दुध प्यायची वेळ झाली.
शुभ सकाळ !

दुखाशिवाय सुख नाही,
निराशेशिवाय आशा नाही..
अपयशाशिवाय यश नाही
आणि पराजयाशिवाय जय नाही..
आणि तुमच्यासारख्या गोड व्यक्तींशिवाय
हे आयुष्य आयुष्यच नाही.
शुभ सकाळ!

शुभ सकाळ मराठी संदेश

आपण ज्याची इच्छा करतो,
प्रत्येकवेळी तेच आपल्याला
मिळेल असे नाही…
परंतु नकळत बऱ्याच वेळा
आपल्याला असे काहीतरी मिळते,
ज्याची कधीच अपेक्षा नसते…
यालाच आपण,
केलेल्या चांगल्या कामाबद्दल
मिळालेले “आशीर्वाद” असे म्हणतो…
शुभ सकाळ!

सकाळ म्हणजे फक्त सूर्योदय नसतो,
ती एक देवाची सुंदर कलाकृती असते,
तो अंधारावर मिळवलेला विजय असतो,
जगावर पसरलेल्या प्रकाशाच्या साम्राज्याची,
साक्ष असते आणि आपल्या आयुष्यातल्या
नव्या दिवसाची आणि ध्येयाची सुरुवात असते…
शुभ प्रभात!

“नशीब” आकाशातून पडत नाही,
किव्हा “जमिनीतून” उगवत नाही..
“नशीब” आपोआप निर्माण होत नाही..
तर, केवळ “माणूसच” प्रत्यक्ष स्वतःचे नशीब
स्वतःच घडवत असतो..
शुभ सकाळ!

आपली काळजी करणाऱ्या माणसाला गमावू नका..
एखाद्या दिवशी जागे व्हाल तेव्हा कळेल कि
तारे मोजण्याच्या नादात चंद्रच गमावला..
शुभ सकाळ!

लोक जेंव्हा तुमच्या विरोधात बोलतील,
आवाज वाढवतील तेंव्हा, घाबरू नका.
फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा,
प्रत्येक खेळात प्रेक्षक आवाज करतात, खेळाडू नाही ..
खेळाडूला फक्त जिंकायचे असते..
शुभ सकाळ !

कळी सारखे उमलुन,
फुलासारखे फुलत जावे..
क्षणा क्षणांच्या लाटांवर,
आयुष्य झुलत जावे..
शुभ सकाळ!

लहानपासुनच सवय आहे
जे आवडेल ते जपुन ठेवायचं..
मग ती वस्तु असो वा….
तुमच्यासारखी गोडं माणसं.
शुभ सकाळ!

एकदा वेळ निघून गेली की
सर्वकाही बिघडून जाते असे म्हणतात..;
पण कधी कधी सर्व काही सुरळीत होण्यासाठी
सुद्धा काही वेळ जाऊ द्यावा लागतो…!
शुभ सकाळ!

मनाशी जोडलेल्या प्रत्येक नात्याला,
कोणत्याही नावाची गरज नसते…
कारण,
न सांगता जुळणाऱ्या नात्यांची,
परिभाषाच काही वेगळी असते…
शुभ सकाळ!

उत्तर म्हणजे काय ते,
प्रश्न पडल्याशिवाय कळत नाही…
जबाबदारी म्हणजे काय हे,
त्या सांभाळल्याशिवाय कळत नाही…
शुभ सकाळ !

पाणी धावतं म्हणून त्याला “मार्ग” सापडतो,
त्या प्रमाणे जो प्रयत्न करतो त्याला यशाची,
सुखाची, आनंदाची वाट सापडतेच…
शुभ सकाळ!

Also Read:

https://sheroshayari.net/good-night-messages-marathi/

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *