Marathi Ukhane

Marathi Ukhane | 1275+ नवरदेव-नवरीसाठी मराठी उखाणे

नव्या-जुन्या पिढीला आवडतील अशा लग्न तसेच अन्य शुभकार्यांसाठीच्या आणि महत्वाचं म्हणजे लक्षात ठेवण्यास सोप्या अशा मराठी उखाण्यांचा मजेशीर संग्रह एकदा तरी नक्की वाचा. आजच्या पिढीला नक्की आवडेल असा नवनवीन, मजेशीर, लग्न तसेच इतर खास दिवसांसाठीच्या Marathi Ukhane मराठी उखाण्यांचा बहारदार नजराणा.

Marathi Ukhane

अलिकडे अमेरिका, पलिकडे अमेरिका,
नाव घ्यायला सांगू नका मी आहे कुमारीका.

संसाराच्या सागरात प्रेमाच्या लाटा,
…रावांच्या सुखदुःखात, माझा अर्धा वाटा.

सासरची छाया, माहेरची माया,
…आहेत, माझे सर्व हट्ट पुरवाया.

जुईची वेणी जाईचा गजरा,
आमच्य़ा दोघांवरती सगळ्यांच्या नजरा.

दोन जीवांचे मिलन जणू शतजन्मांच्या गाठी,
…रावांचे नाव घेते तुमच्या आग्रहासाठी.

संसाराच्या सागरात प्रेमाची होडी,
…रावांमुळे आली माझ्या आयुष्याला गोडी.

नाव घ्या नाव घ्या नावाची काय बिशाद,
….राव तर आहेत माझ्या डाव्या खिशात.

सुगंधात न्हाल्या दिशा धुंद दाही,
…रावांचे नाव हळूच ओठी येई.

मोगऱ्याच्या गजऱ्याचा मस्त सुटलाय सुगंध,
…सोबत मला मिळाला, जीवनाचा आनंद !

आग्रहाखातर नाव घेते, आशीर्वाद द्यावा,
…रावांचा सहवास, आयुष्यभर लाभावा.

मारुतीच्या देवळाला सोन्याचा कळस,
….च नाव घ्यायला मला नाही आळस्..

रुक्मीणीने पण केला क्रुष्णालाचं वरीन,
…रावांच्या साथीनं आदर्श संसार करीन.

लग्न पंक्तीत घेतला उखाणा खास,
अन …. घशात अडकला घास.

चांदीच्या वाटीत सोन्याचा चमचा,
…रावांचे नाव घेते, द्या आशीर्वाद तुमचा.

शिंपल्यात सापडले माणिक मोती,
…रावांच्या जीवनात झाले मी सारथी.

बदामाचा केला हलवा त्यात टाकले काजू किसुन,
….रावं बिड्या पितात संडासात बसून.

महादेवाच्या पिंडीवर बटाट्याची फोड्..
रावांना डोळे मारण्याची लई खोड्.

हिरव्या हिरव्या साडीचा पिवळा काठ जरतारी,
… रावांचे नाव घेताच येई चेहऱ्यावर तरतरी.

दारापुढे काढली, सुंदर रांगोळी फुलांची,
…च नाव घेते, सून मी….ची.

महादेवाला बेल, विष्णूला तुळस,
— रावांचे नाव घ्यायला कसला हो आळस.

सासूबाई आहेत प्रेमळ, जाऊबाई आहेत हौशी,
…रावांचे नाव घेते लग्नाच्या दिवशी.

Marathi Ukhane for Male

सुवर्णाची अंगठी, रुप्याचे पैजंण,
— रावांचे नाव घेते ऐका सारेजण.

मनाच्या व्रुंदावनात आंनद डोलते भावनेची तुळस
— रावांच्या साथीने संसार मंदिरावर सुखाचा कळस.

सासरचे निराजंन माहेरची फुलवात
— रावांचे नाव घेण्यास करते सुरुवात.

आई-वडील सोडताना, पाऊल होतात कष्टी
— रावांच्या संसारात करीन मी सूखाची व्रुष्टी.

जन्म दिला मातेने, पालन केले पित्याने
— रावांचे नाव घेते पत्नी या नात्याने.

नव्या आयुष्याची नवी नवी गाणी
— च्या घराण्यात — रावांची झाले मी राणी.

नाव घ्या नाव घ्या करु नका गजर
रावांचं नाव घ्यायला नेहमीच असते मी हजर.

पैठणीवर शोभे नाजूक मोरांची जोडी…
…मुळे आली माझ्या आयुष्याला गोडी.

मोगऱ्याचा सुगंध, पावसाळ्यातील मृदगंध…
….शी जुळले आता, रेशमी ऋणानुबंध.

माहेर जणू गंगा, सासर जणू सागर
त्यातच एकरुप — रावांचे सूख निर्झर.

पतिव्रतेचा धर्म नम्रतेने वागते
— रावाचं नाव घेऊन आशीर्वाद मागते.

सुगंधात न्हाल्या दिशा धुंद दाही
—- रावाचं नाव ह्ळुच ओठी येई.

हिरव्या साडीला पिवळा काठ जरतारी
— रावांचे नाव घेते, शालू नेसून भरजरी.

आकाशाच्या अंगणात ब्रम्हा,विष्णू आणि महेश
…रावांचे नाव घेऊन करते हो ग्रुहप्रवेश.

सत्य प्रुथ्वीचा आधार,सूर्य स्वर्गाचा आधार
यज्ञ देवतांचा आधार — राव माझे आधार.

मंगळ्सूत्रात राहे सासरची प्रीती
— रावांचे नाव घेऊन समाधान चित्ती.

पित्याचे कर्तव्य संपले,कर्तव्याला माझ्या सुरूवात
— रावांचे सह्कार्य लाभो, माझ्या भावी जीवनात.

गजाननाची क्रुपा, गुरुंचा आशीर्वाद
— रावांचे नाव घ्यायला आज करते सुरुवात.

सुर्यबिंबाचा कुंकुम तिलक, प्रुथ्वीच्या भाळी
— रावांचे नाव घेते — च्यावेळी.

संसाराच्या देव्हा-यात उजळ्तो नंदादीप समाधानाचा
— रावांचे नाव घेऊन,मागते आशिर्वाद अखंड सौभाग्याचा.

स्वर्गाच्या नंदनवनात सुवर्णाच्या केळी
— रावांचे नाव घेते, मंगळागौरीच्यावेळी.

रुप्याच्या वाटीत सोन्याचा चमचा
—रावांचे नाव घेते मिळो आशिर्वाद तूमचा.

सर्वाना नमस्कारासाठी जोडते हो हात
—रावांचे नाव घेते पण सोडा माझी वाट.

Marathi Ukhane for Female

भरलेल्या पंगतीत रांगोळी काढली चित्रांची
—रावांच्या साथीला बसली पंगत मित्रांची.

शंकराच्या पिंडीवर बेलाचे पान
— रावांचे नाव घेते राखुन सर्वांचा मान.

आत्मरुपी करंडा, देहरुपी झाकण
— रावांचे नाव घेऊन बांधते मी कंकण.

कुलीन घराण्यात जन्मले,कुलवान घराण्यात पडले
—रावांच्या जीवावर भाग्यशाली झाले.

नाही मोठेपणाची अपेक्षा,नाही दौलतीची इच्छा
…रावांच्या संसारी आपणा सर्वाच्या शुभेच्छा.

माहेरच्या ओढीने डोळे येतात भरुन
—रावांच्या संसारात मन घेते वळून.

लग्नाचे बंधन,जन्माच्या गाठी
—रावांचे नाव घेते तुमच्यासाठी.

संसाररुपी कादंबरीचे उघडले पहिले पान
—रावांचे नाव घेऊन तुमचा करीते मान.

लक्ष्मी शोभते दागदागिन्यांनी, विद्या शोभते विनयाने
—रावांचे नाव घेते तुमच्या आग्रहाने.

सूख दू:खाच्या धाग्यांनी जीवन वस्त्र विणले
—रावांच्या सहवासात भाग्य माझे हसले.

अंलकारात अंलकार मंगळसूत्र मूख्य
—रावांचा आनंद हेच माझे सौख्य.

मंगळ्सूत्र हा सौभाग्याचा अंलकार
—रावांच्यासह ध्येय, आशा होवोत साकार.

नाव घ्या नाव घ्या आग्रह असतो सर्वांचा
—रावांचे नाव असते ओठांवर,पण प्रश्न असतो उखाण्याचा.

संसार सागरात प्रीतीच्या लाटा
—रावांच्या सुखदु:खात उचलीन मी अर्धा वाटा.

सुखी संसारात हवी विश्वासाची जोड
—रावांचे नाव घेते, घास घालून तोंड करते गोड.

लाल चूटूक मेंदी, हिरवागार चुडा
—रावांसाठी जीव झाला माझा वेडा.

आनंदाच्या लाटांनी भरले मानस सरोवर
आयुष्याचा प्रवास करीन—-रावांच्या बरोबर.

आकाशात चमकतो तारा, अंगठीत चमकतो हिरा
—राव पति मिळाले हाच भाग्योदय खरा.

सोन्याच्या साखळीत खुलतात काळे मणी
—राव झाले माझ्या सौभाग्याचे धनी.

सोन्याच्या साखळीत खुलतात काळे मणी
—राव झाले माझ्या सौभाग्याचे धनी.

मराठी उखाणे

प्रेमाचा दिला हुंडा, मानाची केली करणी
जीवनाचे पूष्प वाहिले—रावांच्या चरणी.

प्रेमाचा दिला हुंडा, मानाची केली करणी
जीवनाचे पूष्प वाहिले—रावांच्या चरणी.

चांदीच्या ताटात पक्वानांची रास
—रावांना देते लाडूचा घास.

अरुणासह ऊषा आली, सोनियाची प्रभा पसरली
—रावांचे नाव घ्यायला मी नाही विसरली.

नातेवाईक जमले केले मोलाचे आहेर
—रावांच्या सहवासासाठी सोडले मायेचे माहेर.

शब्द तिथे नाद कवी तिथे कविता
—रावांची जोड जणू सागर आणि सरिता.

आई, बाबा येते आशीर्वाद दयावा
—रावांचा सहवास जन्मभर लाभावा.

—रावांच्या बरोबर मन गेले गांगरुन
आईबाबांच्या आशिर्वादाची शाल घेते पांघरुन.

मोत्याची माळ,सोन्याचा साज
—रावांचे नाव घेते मंगळागौर आहे आज.

मंगळागौरी माते नमन करते तुला
—रावांचे अखंड सौभाग्य लाभू दे मला.

खडीसाखरेचा खडा खावा तेव्हा गोड
—रावांचे नाव अम्रुतापेक्षा गोड.

थोर कुळांत जन्मले,सुसंस्कारात वाढले
—रावांच्या जीवावर भाग्यशाली झाले.

सर्व सणामध्ये दिवाळीचा सण मोठा
—रावांच्या सहवासात आनंदाला नाही तोटा.

मखमली हिरवळीवर पाखरांचा थवा
—रावांच्या संसारात लावीन दिप नवा.

गोकुळात आला क्रुष्ण,सर्वांना झाला हर्ष
—रावांच्या बाळाला लागले पहिले वर्ष.

इग्रंजी भाषेत आईला म्हणतात मदर
—रावांचे नाव घेते सोडा माझा पदर.

फुलात फुल जाईचे फुल
—रावांनी घातली मला भूल.

Ukhane Marathi for Female

सोन्याची घुंगरं,चांदीच्या वाळ्या
सोनार घडवी दागिने—रावांच्या बाळाला.

वरातीच्या मिरवणूकीत सनईचे करुण सूर
—रावांच्या बरोबर जातांना मनात होते हूरहूर.

दाराच्या चौकटीला गणपतीचं चित्र
—रावांच्या मुळे मिळालं सौभाग्याचं मानपत्र.

अंबाबाईच्या देवळासमोर ह्ळ्दीकुंकवाचा सडा
—रावांच्या नावावर भरते लग्नचुडा.

जीवनात ही घडी अशीच राहू दे
—रावांचे प्रीतफुल असेच हसु दे.

संथ वाहती गंगा,यमुना,आणि सरस्वती
—रावांचे नाव हीच माझ्या प्रेमाची महती.

कस्तुरीचा सुवास दरवळतो रानात
—रावांचे नाव घेते माझ्या मनात.

चंद्राचा उदय, समुद्राला भरती
—रावांच्या शब्दांनी सारे श्रम हरती.

सूख समाधान तिथे लक्ष्मीचा वास
—रावांना देते मी जिलेबीचा घास.

निळया आकाशी रोहिणीस वाटे चंद्रासवे असावे
लग्नाच्या दिवशी — स वाटे –रावांचे नाव घ्यावे.

नागपंचमीच्या सणी सख्या पुजती वारुळाला
—रावांविना शोभा नाही वैभवाच्या देऊळाला.

नाव घ्या नाव घ्या सगळे झाले गोळा
.. च नाव आहे लाख रुपये तोळा.

आजच्या सोहोळ्यात थाट केलाय खास
..ला भरविते जिलेबिचा घास.

आकाशात उडतोय पक्षांचा थवा
..चे नाव घ्यायला उखाणा कशाला हवा.

कळी हसेल फुल उमलेल, मोहरुन येईल सुगन्ध,
.. च्या सोबतीत, गवसेल जीवनाचा आनंद.

मंगळसुत्राचे २ डोरले,एक सासर अन दुसरे माहेर,
—रावांनी दिला मला सौभाग्याचा आहेर.

Ukhane Marathi for Male

काचेच्या ग्लासात गुलाबी शरबत
—राव गेले ऑफिसला मला नाही करमत.

केळीचपान पान चुरुचुरु फाटत..
..रावाच नाव घेताना लई भारी वाटत.

एक होति परि …..
नाव घेते आता जावा आपापल्या घरी.

नेत्ररुपी निरंजनात प्रेमरुपी फुलवात
— चे नाव घेण्यास आजच केली सुरवात.

आशेच्या रंगमंचावर स्वप्नांचे पडसाद
—चे नाव घेते तुम्हा सर्वाचा आशिर्वाद.

दौलत होति तुळस माहेरच्या अंगणात ..
साथि फुलेल आता सासरच्या व्रुन्दवनात्.

नांदा सौख्य भरे दिला सगळ्यांनी आशीर्वाद
…चे नाव घेते द्या सत्यनारायनाचा प्रसाद्.

श्रावणात पडतात सरीवर सरी
—रावांचं नाव घेताना मी होते बावरी.

ग़ूलाबाचे फुल दिसायला ताजे
—नाव घेते सौभाग्य माझे.

द्राक्षाच्या वेलीला त्रिकोणी पान
..चे नाव घेते राखते तुमचा मान.

अंबाबाईच्या देवळाला सोन्याचा कळस
….चं नाव घ्यायचा मला नाही आळस.

ईवले ईवले हरीण,त्याचे ईवले ईवले पाय,
.. राव आले नाहीत अजुन,पिउन पडले की काय..!

Modern Marathi Ukhane for Female

चांदीच्या ताटात ठेवले होते गहू
लग्नच झाले नाही तर नाव कसे घेऊ.

अंगणात पेरले पोतेभर गहू
लिस्ट आहे मोठी, कुणा-कुणाचे नाव घेऊ.

बागेमध्ये असतात, गुलाबांच्या कळ्या
गणपतरावांचे दात म्हणजे दुकानाच्या फ़ळ्या.

सासऱ्याच्या मांडवात पंचपक्वांनाच्या राशी,
पोट्टे पाट्टे जेवुन गेले,जावई राहीला उपाशी.

अत्रावळ पत्रावळ , पत्रावळीवर होती वांग्याची फोड
..हसतात गोड, पण डोळे वटारायची भारीच खोड्.

पुरणपोळीत तुप असावे ताजे अन् साजुक,
..आहेत आमचे फार नाजुक.

लग्नाच्या पंक्तीत घेतला उखाणा खास
अन गणपतरावांच्या घशात अडकला घास.

कर्दळीच्या वनात चंडोल पक्षी लपला
..शी लग्न करून..जन्माचा धुपला.

कौरव-पांडव युध्दात अर्जुनाच्या रथाचे
श्रीकृष्ण झाले सारथी, … आहेत फार निस्वार्थी.

हो-नाही म्हणता म्हणता, लग्न जुळले एकदाचे,
__मुळे मिळाले मला, सौख्य आयुष्यभराचे.

माधुरीच्या अदा, कतरीनाच रूप…
__ ची प्रत्येक गोष्ट, मला भावते खूप.

__माझी आहे, सर्व कलांमध्ये कुशल…
तुमच्या येण्यानं झाला, दिवस एकदम स्पेशल.

लाडाने जवळ गेले, केली जरा घसट
…. एकदम खेकसले, फ़ारच बाई तिरसट !

Navriche Ukhane

बदामाचा केला हलवा त्यात काजू टाकले किसुन.
..राव बिड्या पितात संडासात बसून.

श्रावणात पडतोय रोज पारिजातकांचा सडा,
..ना आवडतो गरम गरम बटाटेवडा.

ती सोबत असली की, खराब मूड होतो बरा
__मुळे कळला, जगण्याचा आनंद खरा.

गोऱ्या गोऱ्या गालावरती तीळ काळा काळा…
__च्या गोड हास्याचा, मला लागलाय लळा.

लहानसहान गोष्टींनीही, आधी व्हायचो त्रस्त …
__आल्यापासून झालंय, आयुष्य खूपच मस्त !

आकाशात उडतोय पक्षांचा थवा
….चे नाव घ्यायला उखाणा कशाला हवा.

एक होती चिऊ आणि एक होता काऊ …
__ च नाव घेतो, डोकं नका खाऊ.

निळ्या निळ्या आकाशात चमचमतात तारे …
__ च नाव घेतो, लक्ष द्या सारे.

उगवला रवी, मावळली रजनी,
…. चे नाव सदैव वसे माझ्या मनी.

उभा होतो मळयात, नजर गेली खळयात,
नवरत्नांचा हार …. च्या गळयात.

उमाचा महादेव आणि सितेचा राम,
…. आली जीवनी आता आयुष्यभर आराम.

कळी हसेल फूल उमलेल,मोहरून येईल सुगंध,
…. च्या सोबतीत,गवसेल जीवनाचा आनंद.

कळी हसेल फूल उमलेल,मोहरून येईल सुगंध,
…. च्या सोबतीत,गवसेल जीवनाचा आनंद.

Also Read:

http://shayari

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *