Birthday Wishes in Marathi | 1200+ वाढदिवस शुभेच्छा मराठी मध्ये
खरंतर वाढदिवस हा तुमच्या जीवनाची सुरुवात आणि जीवनातील आनंद अधोरेखित करणारा दिवस आहे. वाढदिवशी आलेला प्रत्येक संदेश हा नाते फुलवणारा असतो. नात्यातले प्रेम द्विगुणित करणारा असतो. वाढदिवस म्हंटला की शुभेच्छा आल्याच. ज्याचा वाढदिवस असतो त्या आपल्या लाडक्या व्यक्तीला आजकाल वेगवेगळ्या सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा द्यायचा जणू ट्रेंडच झालाय. सगळीकडून हार्दिक शुभेच्छांचा जणू वर्षाव सुरू असतो. त्यात ही जर या शुभेच्छा मराठीतून मिळाल्या तर त्याचं महत्व जरा जास्तच असतं. आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहे 1200 पेक्षा जास्त Birthday Wishes in Marathi वाढदिवसाच्या शुभेच्छांचा खजिना मराठी मध्ये.
Happy Birthday Wishes in Marathi
जल्लोश आहे गावाचा,
कारण वाढदिवस आहे,
माझ्या भावाचा!
वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा !
जे जे हवे तुम्हाला ते ते मिळू दे,
भाग्यवान या शब्दाचा अर्थ तुमच्याकडे पाहुन कळु दे,
शिखरे यशाची सर तुम्ही करावी,
पाहता वळूनि मागे शुभेच्छा माझी स्मरावी,
तुमच्या आनंदाचा वेल गगनाला भिडू दे,
आयुष्यात तुमच्या सर्व काही मनासारखे घडू दे.
जन्मदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
जगातील सर्व आनंद तुला मिळो,
स्वप्नं सगळी तुझ्या पायांशी असो,
माझी गोड परी ज्या दिवशी पृथ्वीवर आली,
तो सुंदर दिवस हा तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
आज आपला वाढदिवस,
आपल्या जीवनातील प्रत्येक दिवस
आपला असा असावा कि समाजातील
प्रत्येक व्यक्तिला आपला हेवा वाटावा.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
व्हावीस तू शतायुषी,
व्हावीस तू दीर्घायुषी,
हि एकच माझी इच्छा,
तुझ्या भावी जीवनासाठी.
वाढदिवसाच्या शुभेच्छा!
आपल्या जिवनात कधीच दुःखाची सर नसावी,
प्रत्येक क्षणी सुखानेच भरलेली आपली ओंजळ असावी,
देवाने आपल्याला इतकी खुशी द्यावी की,
आपण एका दुःखाच्या क्षणासाठी तरसावे.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
आपणास शिवनेरीची श्रीमंती,
रायगडाची भव्यता, पुरंदरची दिव्यता,
सिहंगडाची शौर्यता आणि सह्याद्रीची उंची लाभो,
हीच शिवचरणी प्रार्थना!
आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..
आज देवाला हात जोडूणी आपल्यासाठी
मी एकच मागणी मागतो की,
हे देवा माझ्यासाठी या अनमोल व्यक्तिमत्वाला
आजच्या सुवर्णदिनी असंख्य आनंदाने भरलेला समुद्र द्यावा.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
आयुष्याचा प्रत्येक क्षण खास असतो,
प्रत्येक जण तो क्षण खास पद्धतीने जगतो,
तुझ्या आयुष्यातही असे खास क्षण येवो,
माझी प्रार्थना तुझ्या सोबत असतीलच.
माझी राजकन्या तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
आयुष्याच्या या पायरीवर आपल्या
नव्या जगातील नव्या स्वप्नांना बहर येऊ दे,
आपल्या इच्छा आपल्या आकांक्षा उंच उंच भरारी घेऊ दे,
मनात आमच्या एकच इच्छा आपणास उदंड आयुष्य लाभू दे.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
Best Friend Birthday Wishes in Marathi
नातं आपल्या प्रेमाचं,
दिवसेंदिवस असच फुलावं,
वाढदिवशी तुझ्या,
तू माझ्या शुभेच्छांच्या पावसात भिजावं.
ह्या जन्मदिनाच्या शुभक्षणांनी
आपली सारी स्वप्नं साकार व्हावी
आजचा वाढदिवस आपल्यासाठी
एक अनमोल आठवण ठरावी…
आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य
अधिकाधिक सुंदर व्हावं…
हीच शुभेच्छा !
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
यशस्वी व औक्षवंत हो!
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा!
आपल्या दोस्तीची किंमत नाही आणि
किंमत करायला कोणाच्या बापाची हिंमत नाही.
वाघासारख्या भावाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
दुःख आणि वेदना तुझ्यापासून दूर राहाव्या
तुझी ओळख फक्त सुखाशी व्हावी
माझी फक्त हीच इच्छा आहे
तुझ्या चेहऱ्यावर सदैव आनंद राहावा
हॅपी बर्थडे माझ्या गोडुलीला!
केला तो नाद झाली ती हवा
कडक रे भावा तुच आहे छावा
भावाची हवा..आता तर DJ च लावा.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भावा !
कितीही रागावले तरी समजून घेतले मला,
रुसले कधी तर जवळ घेतले मला,
रडवले कधी तर कधी हसवले,
केल्या पूर्ण सर्व माझ्या इच्छा,
वाढदिवसाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा!
जीवेत शरद: शतं ! पश्येत शरद: शतं !
भद्रेत शरद: शतं ! अभिष्टचिंतनम !
जन्मादिवसस्य शुभाशय: !
जन्मदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
तुझ्या येण्याने आयुष्य सुंदर झालं आहे
हृदयात माझ्या तुझी सुंदर छबी आहे
चुकूनही जाऊन नकोस माझ्यापासून लांब
प्रत्येक पावलावर मला तुझी गरज आहे.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
Birthday Wishes for Brother in Marathi
तू नव्हतीस तेव्हाही मी जगतच होतो.
नाहीच असं नाही पण तुझ्या
येण्याने आयुष्याची बाग खर्या अर्थाने बहरून आली….
पूर्वीचेच क्षण तुझ्या सहवासात नव्या आनंदाने बहरून आले…
पूर्वीचेच दिवस तुझ्याप्रमाणे नव्या चैतन्याने सजून गेले…
आता आणखी काही नको,
हवी आहे ती फक्त तुझी साथ आणि तुझ्या प्रेमाचं अनमोल नातं !
बस्स ! आणखी काही नको… काहीच !
वाढदिवसाच्या प्रेमशुभेछा !
तुमचा वाढदिवस ख़ास आहे,
कारण तुम्ही आमचे प्रेरणास्थान आहात..
या सुखी आणि समृद्ध परिवाराचा
तुम्हीच तर खरा मान आहात.
बाबा तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
येणारा प्रत्येक दिवस तुमच्या आयुष्यात
भरभरून यश आणि आनंद घेऊन येवो,
देवाकडे एवढीच प्रार्थना आहे कि
तुम्हाला आयुष्यात वैभव, प्रगती, आरोग्य,
प्रसिध्दी आणि समृद्धी मिळावी..
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
सुगंध बनून तुझ्या डोळ्यात सामावेन,
समाधान बनून तुझ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देईन
समजून घेण्याचा प्रयत्न करत दूर राहूनही
मी तुझ्यासोबतच असेन. वाढदिवसाच्या शुभेच्छा.
उगवता सूर्य तुम्हाला प्रखर तेज देवो,
उगवणारी फूल तुमच्या आयुष्यात गंध भरावी,
ईश्वर तुम्हाला सर्व सुख आणि समृद्धि देवो.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
आयुष्यातले सगळे क्षण आठवणीत राहतात
असं नाही, पण काही क्षण असे असतात जे विसरु
म्हणताही विसरता येत नाहीत.
हा वाढदिवस म्हणजे त्या अनंत
क्षणातला असाच एक क्षण.
हा क्षण मनाला एक वेगळ समाधान देईलच. पण
आमच्या शुभेच्छांनी वाढदिवसाचा हा क्षण
एक”सण” होऊ दे हीच सदिच्छा..!
Birthday Wishes for Sister in Marathi
देवाकडे जे काही तुम्ही मागणार ते सर्व तुम्हाला मिळो,
आयुष्याच्या या नवीन वाटेवर
तुमच्या नवीन स्वप्नांना भरारी मिळो,
तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करण्याची शक्ती तुम्हाला मिळो.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
हे देवा,
तुझ्या प्रार्थनांची उब माझ्या बहिणीवर राहू दे
सर्व सुखांनी सजलेलं माझ्या बहिणीचं घर असू दे.
सर्वात वेगळी आहे माझी बहीण
सगळ्यात प्रेमळ आहे माझी बहीण
कोण म्हणतं आयुष्यात सुखच आहे सर्वकाही
माझ्यासाठी माझी बहीणच आहे सर्वकाही
हॅपी बर्थडे ताई !
तुमच्या स्वप्नांना किनारा नसावा,
तुमच्या इच्छा शक्तीला प्रतिबंध नसावा,
जेव्हा तुम्ही एक तारा मागणार
तेव्हा देव तुम्हाला सर्व आकाश देवो!
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
सागरासारखी अथांग माया भरलीय तुझ्या हृदयात.
कधी कधी तर तू मला आपली आईच वाटतेस.
माझ्या भावनांना, केवळ तूच समजून घेतेस.
माझ्या जराशा दुःखाने, तुझे डोळे भरून येतात.
अशी माझ्याबद्दल हळवी असणारी दीदी तू,
कधी कधी प्रसंगी, खूप खंबीरही वाटतेस.
मनात आत्मविश्वास, तुझ्यामुळेच जागृत होतो.
तूच आम्हाला धीर देतेस..
तू नेहमी सुखात रहावी हीच सदिच्छा !
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
तुझा वाढदिवस आमच्यासाठी जणु पर्वणीच असते,
ओली असो वा सुकी असो,
पार्टी तर ठरलेलीच असते,
मग कधी करायची पार्टी?
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा!
तुझ्या वाढदिवसाचे हे सुखदायी क्षण
तुला सदैव आनंददायी ठेवत राहो
आणि या दिवसाच्या अनमोल आठवणी
तुझ्या हृदयात सतत तेवत राहो
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
वाढदिवस येतो,
स्नेही आणि मित्रांचे प्रेम देतो
एक नवीन स्वप्न घेऊन येतो
जीवनात आनंदाच्या क्षणांना उजाळा देतो
आयुष्याला योग्य दिशा देतो
जीवन किती सुंदर आहे हळूच सांगून जातो
आपणास उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा!
वाढदिवस शुभेच्छा मराठी
चाहूल तुझी लागताच आनंदी झालो आम्ही
तुझ्या बाललीलांमध्ये रमून गेलो आम्ही
यशवंत हो दीर्घायुषी हो
बाळा तुला आजीआजोबांकडून
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
दिसायला एखाद्या हिरो ला ही लाजवणारे
कॅडबरी बाॅय आपले लाडके गोजीरे
डझनभर पोरिंच्या मनावर राज्य करणारे
मुलींमधे dashing_boy या नावाने प्रसिद्द असलेले
आपल्या Royal भावाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
मी खूप भाग्यवान आहे,
मला बहीण मिळाली,
माझ्या मनातील भावना समजणारी,
मला एक सोबती मिळाली,
प्रत्येक जन्मी तूच माझी बहीण असावीस,
आजच्या दिवशी मला तू बहीण म्हणून मिळालीस
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !
आपल्याला वाढदिवसानिमित्त शुभेच्छा,
तुमच्या मनातील सर्व स्वप्न पूर्ण होऊ दे
आपल्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होउदे
तुमच्या सर्व प्रयत्नाना यश मिळू दे
हीच ईशवर चरणी प्रार्थना.
नाती जपली प्रेम दिले
या परिवारास तू पूर्ण केले
पूर्ण होवो तुझी प्रत्येक इच्छा
वाढदिवशी हीच एक सदिच्छा!
नेहमी आनंदी रहा,
कधीच दुःख तुमच्या वाटेला येऊ नये,
समुद्रासारखी खोल तुमची ख्याती व्हावी,
आणि आभाळाएवढ ह्रदय व्हावं,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
झेप अशी घ्या की पाहणा-यांच्या माना दुखाव्यात,
आकाशाला अशी गवसणी घाला की पक्ष्यांना प्रश्न पडावा,
ज्ञान इतके मिळवा की सागर अचंबित व्हावा,
इतकी प्रगती करा की काळ ही पाहत रहावा.
कर्तुत्वाच्या अग्निबाणाने ध्येयाचे गगन भेदून यशाचा
लख्ख प्रकाश तुम्ही चोहीकडे पसरवा…
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.!
येणारा प्रत्येक दिवस हा माझ्या परीचा असावा,
जीवनात तुझ्या कधी दुःखाचा क्षण नसावा..
मनात तुझ्या जे जे असेल ते ते तुला मिळावे,
प्रयत्नांना तुझ्या नेहमी उदंड यश लाभावे..
हसत खेळत पूर्ण व्हाव्या तुझ्या सर्व इच्छा,
परी तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा !
Birthday Wishes for Wife in Marathi
तुला तुझ्या आयुष्यात सुख,
आनंद व यश लाभो,
तुझे जीवन हे उमलत्या
फुलासारखे फुलून जावो,
त्याचा सुगंध तुझ्या सर्व
जीवनात दरवळत राहो,
हीच तुझ्या वाढदिवसानिमित्त
ईश्वरचरणी प्रार्थना!
वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा!
कधी रुसलीस कधी हसलीस,
राग कधी आलाच माझा तर उपाशी झोपलीस,
मनातले दुःख कधी समजू नाही दिलेस,
पण आयुष्यात तू मला खूप सुख दिलेस…
वाढदिवसाच्या शुभेच्छा!
माणसांच्या या गर्दीत अनेक चेहरे भेटतात…
काही चांगले, काही वाईट काही कधीच लक्षात न राहणारे
आणि काही कायमचे मनात घर करणारे..
मनात घर करणारी जी अनेक माणसं
जगतांना लाभली त्यातले एक तुम्ही
म्हणूनच, या वाढदिवसानिमित्त आपुलकीच्या शुभेच्छा !
आजचा दिवस आमच्यासाठीही खास आहे,
तुला उदंड आयुष्य लाभो,
मनी हाच ध्यास आहे!
यशस्वी हो, औक्षवंत हो,
अनेक आशीर्वादांसह
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा!
कितीही रागावले तरी समजून घेतले मला,
रुसले कधी तर जवळ घेतले मला,
रडवले कधी तर कधी हसवले,
केल्या पूर्ण सर्व माझ्या इच्छा,
वाढदिवसाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा!
सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे,
a सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस,
सोनेरी दिवसाच्या सोनेरी शुभेच्छा,
केवळ सोन्यासारख्या लोकांना.
आयुष्याच्या या पायरीवर
तुमच्या नव्या जगातील नव्या स्वप्नांना बहर येऊ दे.
तुमच्या इच्छा तुमच्या आकांक्षा उंच उंच भरारी घेऊ दे.
मनात आमच्या एकच इच्छा
आपणास उद्दंड आयुष्य लाभू दे…
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
नवा गंद नवा आनंद
निर्माण करीत प्रत्येक क्षण यावा
व नव्या सुखांनी, नव्या वैभवांनी
आनंद शतगुणित व्हावा.
ह्याच तुम्हांला वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा!
कोणाच्या हुकमावर नाय जगत
स्वताच्या रूबाबवर जगतोय
अशा दिलदार व्यक्तिमत्वाला
जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!
वर्षाचे ३६५ दिवस_महिन्याचे ३० दिवस
हफ्त्याचे ७ दिवस
आणि माझ्या आवडीचा १ दिवस
तो म्हणजे माझ्या भावाचा वाढदिवस..
भाऊ तुला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी
ह्या जन्मदिनाच्या शुभक्षणांनी
आपली सारी स्वप्नं साकार व्हावी
आजचा वाढदिवस आपल्यासाठी
एक अनमोल आठवण ठरावी…
आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य
अधिकाधिक सुंदर व्हावं हीच शुभेच्छा!
नवे क्षितीज नवी पाहट ,
फुलावी आयुष्यातील स्वप्नांची वाट.
स्मित हास्य तुमच्या चेहऱ्यावर राहो.
तुमच्या पाठीशी हजोरो सुर्य तळपत राहो
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
तुझा वाढदिवस म्हणजे आनंदाचा झुळझुळ झरा,
सळसळणारा शीतल वारा !
तुझा वाढदिवस म्हणजे सोनपिवळ्या
उन्हामधल्या रिमझिमणाऱ्या श्रावणधारा.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
कधी कधी असंही होतं,
फार महत्वाचं म्हणून जपलेलं,
ऐनवेळी विसरून जातं..
तुझ्या वाढदिवसाचं असंच झालं,
विश्वास आहे कि,
हे तू समजून घेशील..
वाढदिवसाच्या उशिरा दिलेल्या शुभेच्छा!
दिवस आज आहे खास,
तुला उदंड आयुष्य लाभो हाच मनी ध्यास.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
नवा गंध, नवा आनंद निर्माण करीत प्रत्येक क्षण यावा
नव्या सुखांनी, नव्या वैभवांनी आनंद शतगुणित व्हावा
ह्याच तुम्हांला वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा.
झेप अशी घ्या की पाहणाऱ्यांच्या माना दुखाव्यात.
आकाशाला अशी गवसणी घाला की पक्ष्यांना प्रश्न पडावा.
ज्ञान असे मिळवा की सागर अचंबित व्हावा..
इतकी प्रगती करा की काळही पहात राहावा..
हीच आपणास वाढदिवसा निमित्त मनस्वी शुभकामना.
तुमच्या वाढदिवसाचे हे सुखदायी क्षण तुम्हाला सदैव आनंददायी ठेवत राहो.
आणि या दिवसाच्या अनमोल आठवणी तुमच्या हृदयात सतत तेवत राहो.
हीच मनस्वी शुभकामना.
संकल्प असावेत नवे तुझे.
मिळाव्यात त्यांना नव्या दिशा.
प्रत्येक स्वप्न पूर्ण व्हावे तुझे.
ह्याच वाढदिवसाच्या शुभेच्छा.
उगवता सुर्य तुम्हाला आशीर्वाद देवो..
बहरलेली फुले तुम्हाला सुगंध देवो..
आणि परमेश्वर आपणांस सदैव सुखात ठेवो.
वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा!
शिवछत्रपतींच्या आशीर्वादाने गाठावी यशाची शिखरे.
आदर्श शंभूचा ठेवता लाभो मस्तकी मानाचे तुरे..
जन्मदिवसाच्या लाख लाख शिव शुभेच्छा..
आऊसाहेब जिजाऊ आपणास उदंड आयुष्य देवो हीच इच्छा.
Birthday Wishes for aai in Marathi
शिखरे उत्कर्षाची सर तुम्ही करीत रहावी !
कधी वळून पाहता आमची शुभेच्छा स्मरावी !
तुमच्या इच्छा आकांक्षांचा वेलू गगनाला भिडू दे !
तुमच्या जीवनात सर्वकाही मनासारखे घडू दे !
तुला दिर्घ आयुष्य लाभो ही इच्छा.
तुम्हाला तुमच्या आयुष्यात खूप सारं यश मिळावं..
तुमचं जीवन उमलत्या कळीसारखं फुलावं.
त्याच सुगंध तुमच्या जीवनात दरवळत राहो.
हीच देवाकडे प्रार्थना आहे.
वाढदिवसाच्या तुम्हाला खूप साऱ्या शिवमय शुभेच्छा.
आपल्या दोस्ताची किंमत नाही आणि
किंमत करायला कोणाच्या बापात हिंमत नाही.
वाघासारख्या भावाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
मनाला अवीट आनंद देणारा
तुझ्या वाढदिवसाचा क्षण आला की
वाटतं आयुष्य आनंदाने भरलेलं आहे.
वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा.
जे देवाकडे मागशील तू ते तुला मिळो
हीच आज देवाकडे मागणी आहे माझी.
वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा
तुझ्या ईच्छा आकांक्षा उंच भरारी घेऊ दे
मनात आमच्या एकच ईच्छा तुला उदंड आयुष्य लाभुदे
लाडक्या परीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
आयुष्यात सगळी सुख तुला मिळो
फक्त मला बर्थडे पार्टी
द्यायला विसरू नको.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
तुला तुझ्या आयुष्यात सुख, आनंद व यश लाभो,
तुझे जीवन हे उमलत्या फुलासारखे फुलून जावो,
त्याचा सुगंध तुझ्या सर्व जीवनात दरवळत राहो,
हीच तुझ्या वाढदिवसानिमीत्त ईश्वरचरणी प्रार्थना.
शिवमय वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
प्रत्येक वाढदिवसागणिक तुमच्या यशाचं आभाळ
अधिक अधिक विस्तारीत होत जावो.
तुमच्या समृध्दीच्या सागाराला किनारा नसावा.
तुमच्या आनंदाची फुलं सदैव बहरलेली असावीत.
आपले पुढिल आयुष्य सुख, समृद्धि आणि ऐश्वर्य संपन्न होवो हीच सदिच्छा.
वाढदिवसाच्या शिवमय शुभेच्छा.
जन्मापासूनच जिम चा शोकीन असलेले,
जन्मल्या जन्मल्या नर्स जवळची दुधाची बाटली ला डंबेल
समजून ६ पॅक चे स्वप्न पाहणारे आणि जिम ला जाणारे,
काही कामधाम नसतांना उगाच आपल्या
सासुरवाडीला प्रत्येक वीकएंड ला चक्कर मारणारे.
कोणी सेल्फी काढत असला कि वेड
वाकडा तोंड करून सेल्फी चा मोह करणारे.
दोस्ती करावी तर मरेपर्यंत या तत्वावर चालणारे
तालुक्यावर हवा करत असणारे अशे आमचे जवळचे मित्र
दोस्तीच्या दुनियेतला जिगर माणूस
यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
Birthday Wishes for Friend in Marathi
देवा माझ्या मित्राला सुखात ठेव
त्याचा वाढदिवस कधी ही असुदे
प्रत्येक वेळी मी तुझ्याकडे येवढेच मागणे मागतो
त्याला आनंदी ठेव.
Happy Birthday Mitra.
तू आमच्या जीवनातील एक सुंदर परी आहेस
मम्मी पप्पांची छोटीशी बाहुली आहेस
तूच आमच विश्व आणि तूच आमचा प्राण आहेस
लाडक्या लेकीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
हसणाऱ्या हृदयातही दुःख आहे
हसणाऱ्या डोळ्यातही कधी अश्रू येतात
पण मी एकच प्रार्थना करेन तुझं हसू कधीच थांबू नये
कारण तुझ्या हास्याचे आम्हीही दिवाने आहोत.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
तुमच्या आनंदाची फुलं सदैव बहरलेली असावीत
तुमचे आयुष्य एक अनमोल आदर्श बनावे
ईश्वर आपणास दीर्घायुष्य देवो
आपल्या आयुष्यात आपणास हवे ते मिळो
आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
चांगले मित्र येतील आणि जातील,
पण तुम्ही नक्कीच माझे खास
आणि जिवाभावाचे सोबती असाल.
मला तुझ्यापेक्षा चांगले कोणीही समजत नाही,
मी खूप नशीबवान आहे कारण
तुमच्या सारखे मित्र माझ्या जीवनात आहेत.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
मी श्वास घेण्याचं एकमेव कारण आहेस तू
माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम गोष्ट आहेस तू
माझं पहिलं आणि शेवटचं प्रेम आहेस तू
माझी अर्धांगिनी, माझ्या हृदयाची राणी आहेस तू..
आजचा दिवस माझ्यासाठी खूप खास आहे..
तुला वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा!
वाढदिवस येतो
स्नेही आणि मित्रांचे प्रेम देतो
एक नवीन स्वप्न घेऊन येतो
जीवनात आनंदाच्या क्षणांना उजाळा देत
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
तुझ्या वाढदिवशी मला जाणवलं की,
मी जगातील सर्वात सुंदर आणि प्रेमळ
स्त्रीबरोबर आणखी एक वर्ष जगलो आहे.
तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
Also Read: