Marathi Status
|

Marathi Status | 1200+ बेस्ट मराठी स्टेटस

हल्लीच्या जगात सोशल मीडिया जीव की प्राण झाला आहे. त्यातल्या त्यात तुम्हाला एखादी गोष्ट लोकांपर्यंत पटकन पोहोचवायची असेल तर पटकन स्टेटस ठेवले जाते. तुमच्या पोस्टपेक्षाही स्टेटस अधिक लोकांपर्यंत पोहोचते. तुम्ही स्टेटस ठेवल्या ठेवल्या त्याचे नोटीफिकेशन समोरच्या व्यक्तीला जाते आणि तुमची अधिक माहिती लोकांना कळते. त्यामुळे हल्ली सगळीकडेच सोशल मीडिया स्टेटसला महत्व प्राप्त झाले आहे. म्हणूनच आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत बेस्ट मराठी स्टेटसचा Marathi Whatsapp Status संग्रह. जर आपण पण फेसबुक व व्हाट्सअँप साठी मराठी स्टेटस Marathi Status शोधत असाल तर आमचा हा मराठी स्टेटस संग्रह जरूर वाचा.

Marathi Status

अपयशाने निराश होऊ नका,
ज्या पायऱ्या तुम्हाला खाली आणतात,
त्याच पायऱ्या तुम्हाला वर पण घेऊन जातात.

गमवायला काहीच नसताना फक्त
कमावण्याची संधी असते हे लक्षात ठेवा.
शून्याची ताकद ओळखा.

तुमच्याकडे वेळ फार कमी आहे,
तेव्हा कोणा दुसऱ्याचं आयुष्य जगणं सोडून द्या.

यशस्वी व्यक्तींच्या यशोगाथा
वाचत बसाल तर उत्कृष्ट वाचक व्हाल,
त्यांच्या गोष्टी अमंलात आणाल तर महान बनाल.

हातावरच्या रेषा बदलायच्या असतील,
तर मेहनतीवर विश्वास ठेवा,
जर प्रयत्न तगडे असतील तर,
नशीबालाशी वाकावे लागते इतकेच लक्षात ठेवा.

ध्येय गाठण्यासाठी मेहनतीचा वेग
इतका जोरात हवा की,
अडथळे केव्हा आले आणि केव्हा गेले
समजले पण नाही पाहिजे.

समुद्राला गर्व होता कि तो संपूर्ण जग बुडवू शकतो,
इतक्यात एक तेलाचा थेंब आला आणि त्यावर सहज
तरंगत निघून गेला.

पंख त्यांचेच मजबूत असतात जे एकटे उडतात
आणि प्रवाहाविरुद्ध झेप घेतात.

अडचणी आयुष्यात नाही तर मनात असतात,
ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल
त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल.

तुम्हाला सिंह बनायचे असेल तर
सिंहाच्याच संगतीत राहावं लागेल.

वेळ आला आहे तर घाम गाळा
नाहीतर काही दिवसांनी अश्रू गाळावे लागतील.

आपण जिंकणार याच विचाराने
कामाला सुरवात करा.

निर्णय चूक किंवा बरोबर नसतात
त्यांचे परिणाम सकारात्मक किंवा
नकारात्मक असतात.

Marathi Whatsapp Status

मला इगो सोडायचाय
पण त्यातही इगो आड येतो.

ध्येय एवढं मोठे ठेवा की,
समोर येणाऱ्या अडचणी फिक्या पडतील.

ज्या दिवशी आपले विचार मोठे होतील,
त्या दिवशी मोठे मोठे लोक आपला विचार सुरु करतील.

अनुभव हा उत्तम शिक्षक आहे
पण त्याची फी आपल्याला परवडत नाही.

जीभ जर ओव्हरटाईम करत असेल तर
मेंदू संपावर आहे हे नक्की.

जीवनात रस्ता दिसत नसेल तर दूरचं
पाहण्याचा प्रयत्न करणं व्यर्थ असतं,
एक एक पाऊल पुढे टाकत चला
रस्ता आपोआप मोकळा होत जाईल.

विषय किती वाढवायचा,
कुठे थांबवायचा व कुठे दुर्लक्ष करायचं
हे ज्याला जमते,
तो जगातील कुठल्याही
परिस्थितीवर मात करू शकतो.

त्या व्यक्तीला कधीच इग्नोर करू नका
ज्याने तुमच्यासाठी पूर्ण दुनियेला इग्नोर केलं.

राग आल्यावर ओरडायला कधीच ताकद लागत नाही,
राग आल्यावर शांत बसायला खरी ताकद लागते.

निर्णय चूक किंवा बरोबर नसतात
त्यांचे परिणाम सकारात्मक किंवा
नकारात्मक असतात.

वय आणि पैसा यावर कधीच गर्व करू नये,
कारण ज्या गोष्टी मोजल्या जातात
त्या नक्कीच संपतात.

एकदा का आपल्या खांद्यांना
आव्हान पेलायची सवय झाली,
की आपली पावलं सुद्धा
आपोआप संघर्ष करू लागतात.

मनातलं जाणणारी आई
आणि भविष्य ओळखणारा बाप
म्हणजे जगातील एकमेव ज्योतिष.

एकवेळ माणूस बोलून कडवा असावा
पण गोडबोल्या भडवा नसावा.

अंथरून पाहून पाय पसरले कि
कुणापुढे हात पसरावे लागत नाहीत.

माणसाला एखादी गोष्ट
करायची असेल तर मार्ग सापडतो,
आणि करायची नसेल तर कारणं सापडतात.

बेस्ट मराठी स्टेटस संग्रह

जीवनात काही केलं नाही तरी चालेल
पण स्वतःवरचा विश्वास
मात्र कधीही कमी होऊ देऊ नका.

जगणं सोपं आहे
फक्त काड्या करणाऱ्याच्या
नाड्या लक्षात आल्या पाहिजेत.

जेव्हा तुम्ही स्वतःला गरीब म्हणता
तेव्हा तुम्ही आयुष्याची लढाई हारली असे समजा.

जगात काहीच फुकट भेटत नाही
सल्ल्याशिवाय!

जर तुम्ही माझ्या संघर्षाच्या वेळी गैरहजर असाल,
तर अपेक्षा पण ठेवू नका माझ्या यशाच्या वेळी
हजर राहण्याची.

आपल्याला चटके देणारे काही दिवे तेच असतात,
ज्यांना आपण वाऱ्यामुळे विझताना वाचवलेलं असतं.

माणसाची नीती चांगली असेल तर
मनात भीती उरत नाही.

काय चुकलं हे शोधायला हवं
पण, आपण मात्र
कोणाचं चुकलं हेच शोधत राहतो.

यशस्वी माणसं पैश्यासाठी काम करत नाहीत,
पैश्याला त्यांच्यासाठी काम करायला लावतात.

माणूस म्हणतो,
पैसा आला की मी काही तरी करेन
पैसा म्हणतो,
तू काहीतरी कर मगच मी येईन.

स्वतःच्या मेहनतीवर विश्वास असणाऱ्यांना
आपला प्रतिस्पर्धी काय करतोय याची
अजिबात पर्वा नसते.

आळशी माणूस
कामाच्या विचारानेही थकतो.

या जगात बोलणारे आणि विचार करणारे खूप आहेत,
तुम्ही कृती करणारे व्हा.

मी सगळ्या विचारांची माणसे जवळ ठेवतो,
कारण कधी कधी गटारातले पाणी पण
आग विझवायचं काम करते.

चांगल्या वेळेची वाट पाहणे सोडून द्या,
कारण वेळ कधीच तुमची वाट पाहणार नाही.

हातचे सोडून पळत्याच्या मागे
कधीही लागू नये.

डोक्यामध्ये सकारात्मक विचार भरले नाही तर
नकारात्मक विचार आपली जागा बनवतात.

समजूतदार लोक कधी भांडत नाहीत
फक्त आग लावून बाजूला होतात.

छाटले जरी पंख माझे पुन्हा उडेन मी,
कारण अडवू शकेल मला अजून अशी भिंत नाही.

मी संकटाना कधीच शोधत नाही
पण त्यांनाच मी सापडतो.

पैसे कमवायला एवढा वेळ वाया घालवू नका की
नंतर पैसे खर्च करायला वेळच मिळणार नाही.

काही नाही या शब्दामागे
खूप काही लपलेलं असतं.

fb Status Marathi

आयुष्य म्हणजे तुम्ही किती श्वास घेतलेत हे नसून
तुमच्या आयुष्यात श्वास रोखणारे किती क्षण आले हे आहे.

जर तुम्ही तणाव हाताळू शकला नाही,
तर यशही हाताळू शकणार नाही.

फक्त जिंकणारच नाही तर,
कधी, कुठे काय हरायचं
हे जाणणारा सुद्धा सिकंदर असतो.

चांगल्या रस्त्याला गतिरोधक
आणि चांगल्या व्यक्तीला विरोधक हे
असतातच.

तुमच्याने पुढे जाता येत नसेल तर जाऊ नका,
पण पुढे जाणाऱ्याला मागे खेचू नका.

बारशाला घरातले आणि
इतर वेळेस बाहेरचे नाव ठेवतात.

रात्रीचा अंधार कितीही मोठा असू द्या,
सकाळचा सूर्य प्रकाश घेऊनच येतो.

चांगल्या दिवसांची किंमत
वाईट दिवसांना सामोरे गेल्याशिवाय
कळत नाही.

कोणालाही आपल्या कुमकुवत बाजू सांगू नका,
आजचा तुमचा दोस्त उद्या तुमचा वैरी होऊ शकतो.

सोडून देऊ नका
कधी कधी चाव्यांच्या जुडग्यात
शेवटची चावी त्या कुलुपाची असते.

जग गरजेच्या नियमानुसार चालत असतं
थंडीत ज्या सूर्याची वाट बघितली जाते,
उन्हाळ्यात त्याच सूर्याचा तिरस्कार केला जातो,
तुमची किंमत तेव्हा होईल
जेव्हा तुमची गरज लक्षात येईल.

संसार असाच असतो
लाकडाचा धूर डोळ्यात जातो म्हणून
चूल पेटवायची थांबवायचं नसतं.
जीवनात दरी निर्माण झाली म्हणून
आपण खोल खोल जायचं नसतं
ती दरी पार करायची असते.

शून्यातून विश्व निर्माण करण्याची जिद्द
ज्याचा अंगी असते तोच खरा कर्तृत्ववान होय.

नशीब हातात येत नाही
तो पर्यंत नशिबाने आलेले
हात वापरा.

खेळ पत्त्यांचा असो किंवा आयुष्याचा
तुमचा एक्का तेव्हाच दाखवा जेव्हा
समोर बादशाह असेल.

आजकाल बाईकवर मुलांच्या मागे
मुली अश्या बसतात जणू
विक्रमादित्याला वेताळ लटकला आहे.

आयुष्यात कितीही अपयश पदरात पडलं तरी चिंता नाही,
कारण जिंकण्याची जिद्द जोपर्यंत जिवंत आहे,
तोपर्यंत कोणीही तुम्हाला रोखू शकत नाही.

Also Read:

https://sheroshayari.net/broken-heart-shayari-in-hindi/

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *